शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेबाबत शेगाव संस्थानविषयी शरद पवारांकडून गौरवोदगार

By admin | Updated: September 19, 2016 18:57 IST

स्वच्छतेचे पटत असल्याने देशभरात ह्यस्वच्छ भारतह्ण चा गजर सुरु झाला असताना माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानमधील स्वच्छतेबाबत

गिरीश राऊतबुलडाणा, १९  : स्वच्छतेचे पटत असल्याने देशभरात ह्यस्वच्छ भारतचा गजर सुरु झाला असताना माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानमधील स्वच्छतेबाबत गौरवोदगार व्यक्त केले आहेत. राज्यात सर्वत्र सकल मराठा समाजबांधवांच्यावतीने विराट मराठा क्रांती मूक मोर्चे काढण्यात येत आहेत. या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येत मराठा समाज बांधव सहभागी होत आहेत. लाखोंचा सहभाग म्हटल्यावर विविध खाद्यपदार्थांचे तसेच पिण्याच्या पाण्याचे पाऊच, प्लास्टिक ग्लास व इतर कचरा होणारच. मात्र मोर्चामुळे कचरा होवून कोणाला उपद्रव होवू नये याची खास काळजी घेतल्या जात आहे. या स्वच्छता मोहीमेसाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे.

या स्वयंसेवकांकडून पडता क्षणीच कचरा उचलण्यात येत आहे. हीच पध्दत शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येत असून त्याचाच आदर्श या मोर्चेकरींकडून घेतला जात आहे. या मोर्चा अनुषंगाने शनिवारी एका वृत्तवाहिनीने माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची मुलाखत घेतली असता या मुलाखतीत त्यांनी संत गजानन महाराज संस्थानमधील स्वच्छतेबाबत गौरवोदगार व्यक्त केले व हिच स्वच्छतेची काळजी मराठा क्रांती मूकमोर्चात घेतल्या जात असल्याला दुजोरा दिला. विशेष म्हणजे याआधी सुध्दा शेगाव भेटीदरम्यान जाहीरपणे शेगाव संस्थानमधील स्वच्छतेबाबत शरद पवारांनी गौरवोदगार काढले होते हे विशेष.