मुंबई : गर्भात जीवघेणे व्यंग असल्याने असे मूल जन्माला आले तरी ते जगणार नाही, या कारणाने गर्भारपणाच्या सहाव्या महिन्यात (२४ आठवडे) डोंबिवलीच्या महिलेला गर्भपात करण्याची मुभा सर्वोच्च न्यायालयाने दिली. या निर्णयानंतर वैद्यकीय चाचण्या करुन शुक्रवारी पहाटे केईएम रुग्णालयात ‘त्या’ महिलेवर गर्भपाताची शस्त्रक्रिया पार पडली. याविषयी, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, शुक्रवारी पहाटे ३.३०च्या सुमारास या महिलेचा गर्भपात करण्यात आला असून तिची प्रकृती आता स्थिर आहे. शनिवारी त्या महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती ‘लोकमत’शी बोलताना दिली. डोंबिवली येथे राहणाऱ्या या तरुणाचा पाच वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्याच्या २३ वर्षीय पत्नीला गर्भधारणा झाल्यानंतर सोनोग्राफीत बाळाच्या डोक्याला कवटीच तयार झालेली नसल्याचे डॉक्टरांना आढळले. त्यामुळे ही महिला मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल झाली. हे बाळ जन्माला आले, तरी ते जगू शकणार नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केल्यानंतर या दाम्पत्याने गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. मात्र सरकारी नियमानुसार २० आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीनंतर गर्भपात करण्यास परवानगी नसल्याने त्यांनी परवानगीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सुनावणीदरम्यान न्या. एस. ए. बोबडे आणि एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने केईएम रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा अहवाल तपासून या दाम्पत्याला गर्भपातची परवानगी दिली. (प्रतिनिधी)।याविषयी, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, शुक्रवारी पहाटे ३.३०च्या सुमारास या महिलेचा गर्भपात करण्यात आला असून तिची प्रकृती आता स्थिर आहे.तिची प्रकृती आता स्थिर आहे.
२४ आठवड्यांनंतर करण्यात आला गर्भपात
By admin | Updated: January 21, 2017 03:18 IST