शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात धावणार अबोली रिक्षा !

By admin | Updated: June 27, 2016 02:22 IST

महिला रिक्षा ‘अबोली’ रंगाची असावी, यावर शिक्कामोर्तब झाल्यावर ठाण्यातील १५६ महिलांपैकी ९२ जणांनी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाशी संपर्क साधला.

पंकज रोडेकर,

ठाणे- महिला रिक्षा ‘अबोली’ रंगाची असावी, यावर शिक्कामोर्तब झाल्यावर ठाण्यातील १५६ महिलांपैकी ९२ जणांनी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाशी संपर्क साधला. नोंदणीपत्र मिळवून ठाणेकरांना सुखकारक आणि सुरक्षित रिक्षेची सेवा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यामुळे लवकर अबोली रंगाची रिक्षा ठाण्यात धावताना पाहायला मिळणार आहे. उर्वरित महिलांनी लवकरात लवकर नोंदणीपत्र घ्यावे, असे आवाहन ठाणे आरटीओने केले आहे.राज्य प्रादेशिक परिवहन विभागामार्फत २०१६ मध्ये एक लाख नवीन परमिटवाटप कार्यक्रम जाहीर केला. त्यामध्ये शैक्षणिक अटीला पूर्णविराम देत महिलांना पाच टक्के आरक्षण दिले. त्यानुसार, मुंबई महानगर क्षेत्रासाठी ३५ हजार ६२८ परवान्यांची लॉटरी जानेवारी २०१६ मध्ये काढली. यामध्ये पाच टक्क्यांप्रमाणे महिलांसाठी १ हजार ७८१ परवान्यांचा समावेश आहे. या लॉटरीमध्ये एकूण ४६५ महिलांनी अर्ज केल्यामुळे या सर्व महिलांना विजेता म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये ठाण्यातील १५६ महिलांचा समावेश आहे.दरम्यान, लॉटरी विजेत्यांची परीक्षाही घेतली. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना तत्काळ आरटीओ विभागाकडून इरादापत्र आणि परमिटचे वाटप करण्यात आले. परंतु, महिला रिक्षाचा रंग निश्चित होत नसल्याने त्यांच्यात नाराजी पसरली होती. त्यातच काही रिक्षा युनियनने रंगाला विरोध के ल्याने अखेर याबाबत हरकती मागवण्यात आल्या. या सर्व प्रकारांत तीन ते चार महिने गेले. अखेर, राज्य परिवहन विभागाने जून महिन्यात महिला रिक्षा अबोली रंगाचीच असावी, यावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर, ठाण्यातील महिला-चालक-मालकांनी आरटीओमध्ये धाव घेऊन नोंदणीपत्र मिळवले. आतापर्यंत १५६ पैकी ९२ जण महिलांनी आरटीओ कार्यालयात येऊन रिक्षा नोंदणीपत्र घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. ठाणे आरटीओ यशस्वीमहिला रिक्षा विशिष्ट रंगाची असावी, यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन सेवेने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले. त्यामुळे महिला रिक्षाला अबोली रंग मिळाला.