शहरं
Join us  
Trending Stories
1
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
2
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
3
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
4
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
5
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
6
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
7
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
8
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
9
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
10
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
11
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
12
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
13
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
14
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
15
Krishna Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
16
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
17
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
18
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
19
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
20
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!

अभंगवाणीने येते जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2016 01:32 IST

सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक उपनगरामधील मंदिरामध्ये काकडारती सुरू झाली आहे.

रहाटणी : सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक उपनगरामधील मंदिरामध्ये काकडारती सुरू झाली आहे. अगदी पहाटे गावातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, तरुण या काकडारतीत सहभागी होताना दिसून येत आहेत.रहाटणी येथील श्री काळभैरवनाथ मंदिर, राम मंदिर व नखाते वस्ती येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात तर पिंपळे सौदागर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात काकडारती सुरू आहे. अगदी पहाटेपासून गोड अभंगाचे सूर परिसरात घुमू लागल्याने परिसरात भक्तिमय वातावरण दिसू लागले आहेत, तर अनेक नागरिक अभंगाचा ध्वनी कानी पडू लागल्याने समाधान व्यक्त करीत आहेत. ही काकडारती खऱ्या अर्थाने कार्तिक महिन्याच्या शुक्ल एकादशीपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत दररोज पहाटे देवाला जागविण्यासाठी मंदिरात काकडारती करण्याची पद्धती प्रचलित आहे. सिमेंटच्या जंगलात परंपरा कायम पूर्वी गावागावांत मातीत बांधलेले मंदिर होते. सध्या याच मंदिराचा जीर्णोद्धार करून सिमेंटने बांधण्यात आले आहेत. तसेच उपनगरात गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आहेत. काकडारती ही अगदी पूर्वीपासून सुरू असलेली परंपरा आहे. गावातील अनेक रूढी-परंपरा कालबाह्य होत असताना मात्र ही परंपरा अनेक गावांनी जोपासली आहे. मंदिरातील सप्ताह, पारायण यासह काकडारती परंपरा अद्यापही जोपासली आहे. (वार्ताहर)>विठ्ठलनगरमधील पुर्नवसन केंद्रात कार्यक्रमनेहरूनगर : विठ्ठलनगर पुनर्वसन येथील श्री हनुमान हौसिंग सोसायटी इमारत क्रमांक १३ येथे या वर्षीही काकडा आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. येथील अण्णासाहेब मगर स्टेडिअमजवळ असलेल्या विठ्ठलनगर पुनर्वसन येथील हनुमान हौसिंग सोसायटी इमारत क्रमांक १३ येथे या वर्षी काकडा आरतीचे आयोजन केले आहे. काकडारतीला १६ आॅक्टोबरपासून सुरुवात झाली असून, काकडारतीचे यंदाचे ३८वे वर्ष आहे. या सप्ताहात प्रत्येक दिवशी कीर्तन व दररोज महाप्रसादाचे वाटप करण्यात येत आहे. सप्ताहात दररोज सायंकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती विघ्नहर्ता प्रतिष्ठानाचे संस्थापक अध्यक्ष संभाजी उडाफे यांनी दिली. कार्यक्रमाचे आयोजन विघ्नहर्ता प्रतिष्ठानाच्या वतीने करण्यात आले आहे.>खडकीकरांना जपली परंपराखडकी : येथील दर्जी गल्लीमधील पुरातन विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात व गाडीअड्डा येथील प्राचीन एकमुखी दत्तमंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत अखंड महिनाभर काकडारती केली जाते. या वेळी खडकीतील वातावरण भक्तिमय होऊन सकाळच्या प्रहरी प्रसन्न होते. खडकीतील भक्तमंडळी एकत्र येऊन भजन करतात. सकाळी आठ वाजेपर्यंत भजन-कीर्तन होते. शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असल्याचे सांगितले जाते. तसेच गाडीअड्डा येथील मंदिरातही विशेष करून तरुण वर्ग पुढाकार घेऊन काकडा आरती परंपरेनुसार सुरू ठेवत आहे. विठ्ठल-रखुमाई मंदिरात हभप विजय लक्कामहाराज सर्व आयोजन करतात. कैलास गायकवाड, विठ्ठल साकुरे, जयसिंग काळे, बबन पांडकर, सुरेश माईनंदाकर, चांगुणाबाई गायकवाड, शरयू खांदोडे, कमल घाडगे, शकुंतला गरसुंद व विठ्ठल-रखुमाई भजनी महिला मंडळ, तसेच गाडीअड्डा येथील दत्ता सावंत, नारायण पवार, सुशील पवार, दीपक लोंढे, हृषीकेश आदमाने यांचे सहकार्य लाभते. >काळेवाडीकरांची काकडा आरतीने होते सुप्रभात काळेवाडी : येथील सर्व ग्रामस्थांच्या वतीने नढेनगरमधील विठ्ठल मंदिरामध्ये तसेच जोतिबा कामगार मित्र मंडळ आयोजित विठ्ठल-रुक्मिणी कॉलनीमधील विठ्ठल मंदिरामध्ये आणि हभप मारुती नढे पाटील व नवनाथ नढे पाटील यांच्या सहकार्याने विठ्ठलराज भजनी मंडळ आयोजित विष्णुराज कार्यालयामध्ये दर वर्षी काकडारतीचे आयोजन केले जात आहे. >अभंगवाणीने येते जागदिघी : विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सकाळपासूनच काकड्याला सुरुवात होते. अभंग, गौळणी, मालिका, पांगळा, आंधळा, पहिले मंगलाचरण, दुसरे मंगलाचरण, काकडा अभंग, भूपाळी अभंग, वासुदेव, जोगी, दळण, मुका, बहिरा, विनवणी, पांडुरंगाची स्तुती, उपसंहाराचे अभंग, भारूडातून नामस्मरण केले जाते.