शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

ए.बी. ... धगधगते यज्ञकुंड

By admin | Updated: January 18, 2015 00:57 IST

भाई बर्धन ! नागपूरला कर्मभूमी बनवून राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविणाऱ्या सुपुत्राला आज सन्मानित केले जाणार आहे. हार,तुरे, सत्कार हे बर्धन यांना नवीन नाही व त्यांना त्याच्यात फारसा रसदेखील नाही.

भाई बर्धन ! नागपूरला कर्मभूमी बनवून राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविणाऱ्या सुपुत्राला आज सन्मानित केले जाणार आहे. हार,तुरे, सत्कार हे बर्धन यांना नवीन नाही व त्यांना त्याच्यात फारसा रसदेखील नाही. स्वातंत्र्यानंतर देशाप्रमाणेच नागपुरात अनेक राजकीय परिवर्तने झाली. वेगवेगळ्या चळवळींनी वेगवेगळे नेते घडविले. काही नेते लोकप्रियतेच्या लाटांवर आरुढ होऊन सत्तापदापर्यंत गेले तर काळाच्या ओघात अ़नेक नेते उपेक्षेच्या तळाशी गेले. परंतु या सर्व घडामोडींमध्ये उपराजधानीतील एका नेत्याची प्रतिमा ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ राहिली. त्यांची निष्ठा, प्रामाणिकपणा, विचार आणि चळवळीची भूमिका आजही कायम आहे. असे अजातशत्रू कम्युनिस्ट नेते भाई अर्धेंदुभूषण बर्धन म्हणजेच जनतेचे लाडके ‘ए. बी.’ यांचे आयुष्य म्हणजे संघर्षाचा एक धगधगता प्रवास आहे. एक अभ्यासक नेता, निर्भय संघटक, नि:स्पृह कार्यकर्ता, कुशल राजकारणी, मार्मिक वक्ता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणते सुसंस्कृत मनुष्य ही ओळख त्यांनी आजही टिकवून ठेवली आहे. जनतेच्या मनातील आदराचे स्थान न गमाविलेल्या अगदी फार थोड्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यांची राजकीय लोकप्रियता कमी जास्त झाली असेल, कधी विरोधही झाला असेल पण ८९ वर्षे वय असलेल्या ‘ए.बी.’ या व्यक्तीविषयीचा आदर आजही तसाच आहे. त्यात कुठलाही ढोंगीपणा नाही, कृत्रिमता नाही. आज होणारा सत्कार हा केवळ बर्धन यांचा सत्कार नाही, तर त्यांचे विचार, त्यांचे कर्म, त्यांचा संघर्ष, त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून झुंजलेला कामगारवर्ग या सर्वांचा सन्मान आहे.अपयशातदेखील कार्यकर्त्यांना दिला उत्साहभाई बर्धन अनेकदा निवडणुकांच्या रिंगणात उतरले आणि एक अपवाद वगळता त्यांना प्रत्येक वेळी पराभवाचा सामना करावा लागला. परंतु पराभवानंतरदेखील त्यांनी कधीच हार मानली नाही व नव्या जोमाने प्रत्येक वेळी ते कामाला लागायचे. निवडणुकीतील अपयश कसे असते हे विचारायचे झाले तर कॉम्रेड बर्धन यांनाच ते विचारावे लागेल. अपयश आले असतानादेखील माझा पक्ष कार्यकर्ता निराश होता कामा नये म्हणून संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाची विचारपूस करणे हा त्यांचा स्वभावगुणच. कार्यकर्त्यांना दिलासा देताना मार्क्सवाद आणि लेनिनवादानी दिलेली शिकवण कार्यकर्त्यांसमोर ठेवून त्यांना परत कामाला लावणे हे कसब बर्धन यांच्यातच पहायला मिळते. निवडणूक झाल्यानंतर ५ वर्षे निवडून गेलेला आणि पराभूत झालेल्या उमेदवारांचे दर्शन जनतेला फारसे होत नसते. परंतु बर्धन मात्र सामान्यांच्या जवळ परत जायचे आणि सर्व काही विसरून मदतीचा हात द्यायचे. हिंमतवाला नेताकॉम्रेड बर्धन यांच्यात विचारशक्तीप्रमाणेच धाडसीवृत्तीदेखील होती. १९६९ साली नागपुरात भीषण जातीय दंगल झाली. एकीकडे तत्कालीन नेते मूग गिळून गप्प असताना बर्धन मात्र जीवाची पर्वा न करता दंगली थांबविण्याचा प्रयत्न करण्यासाठी धडपडत होते. आझाद नगर टेका परिसरात दोन गटात हाणामारी सुरू होती. दंगलीत कशाला पडायचे म्हणून कुणीही ती थांबविण्यासाठी पुढाकार घेतला नव्हता. अचानकपणे बर्धन अक्षरश: धावत तेथे आले व हातात शस्त्र अन् डोक्यात संताप असलेल्या सैतानांच्या मध्ये शिरले. हाणामारी करणाऱ्यांपैकी काही लोकांनी त्यांना ओळखले अन् ‘बर्धन साहाब आप हट जावो’ या शब्दांत त्यांना इशारा दिला. परंतु हाडाचे कार्यकर्ते असलेल्या बर्धन यांनी करारी आवाजात प्रत्युत्तर दिले अन् ‘बंद करो ये तमाशा’ असे कुणालाही न घाबरता सुनावले. बर्धन यांचा त्वेष पाहून दोन्ही गटातील लोक शांत झाले. मिल कामगारांच्या आंदोलनाचा विखारकॉम्रेड बर्धन यांनी उपराजधानीतील मिल कामगारांच्या प्रश्नांना सातत्याने उचलून धरले होते. १९६६ मध्ये मॉडेल मिलमधील कामगारांच्या प्रश्नावर त्यांनी केलेल्या बेमुदत उपोषणाने सरकारला कापरे भरले होते. १९ एप्रिल १९८६ ला टाटांनी एका रात्रीतून १११ वर्षे जुनी असलेली गिरणी बंद पाडली. ही गिरणी महाराष्ट्र सरकारने ताब्यात घेऊन सुरू करावी, या मागणीसाठी बर्धन यांनी एकहाती लढा उभा केला. ६ जून १९८६ रोजी एम्प्रेस मिलचे ‘ताला तोडो’ आंदोलन फार गाजले. मॉडेल मिलच्या चाळींना पाडू नये व चाळीतील कामगारांचे जीवन उद्ध्वस्त होऊ नये याकरिता बर्धन यांनी कामगारांना एकत्रित केले. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांना सुरक्षा व्यवस्था असतानादेखील काळे झेंडे दाखविण्यात आले. यावेळी पोलिसांनी लाठीमार केला अन् जखमी झाले असतानादेखील तत्कालीन पोलीस आयुक्तांनी बर्धन यांना अटक केली. इतकेच नव्हे तर सर्वांसमोर अपमानजनक वागणूकदेखील दिली. परंतु बर्धन यांनी संयम सोडला नाही. नागपुरात कॉम्रेड रुईकर, एम.व्ही.मेहेंद्रे, यांच्यासारख्यांसोबत बर्धन कामगार संघर्षात सतत लढत राहिले. सर्वपक्षीय मित्रत्वभाई बर्धन यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक पैलू म्हणजे सर्व पक्षातील नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. पक्षाच्या पातळीवर वैचारिक मतभेद असले तरी व्यक्तिगत संबंध टिकविण्यावर त्यांचा भर असतो. राजकीय मतभेद असतानाही जनसंघाच्या सुमतीताई सुकळीकरांपासून ते कॉंग्रेसमधील वसंत साठे यांच्यापर्यंत बर्धन यांचे कौटुंबिक संबंध होते. तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली होती. परंतु बाळासाहेबांच्या प्रामाणिक ध्येयनिष्ठेबद्दल प्रशंसोद्गार काढून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. बाळासाहेब देवरसांनी बर्धन यांच्या बुद्धिमत्तेबाबत प्रशंसोद्गार काढले होते. दत्तोपंत ठेंगडींबद्दल आदराने बोलत असताना नितीन गडकरी यांचे ते नेहमी कौतुक करायचे. हिंदू महासभेच्या एका कार्यक्रमात तर विक्रम सावरकरांना सर्वांसमोर आलिंगन दिले होते. परंतु अशा शिष्टाचारांमुळे राजकीय मैदानात विरोधकांना झुंज देण्याच्या त्यांच्या कर्मयोगात कधीही बाधा आली नाही.