शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
8
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
9
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
10
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
11
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
12
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
13
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
14
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
15
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
16
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
17
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
18
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
19
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
20
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी

आरे कॉलनीत सरसकट बांधकाम होणार नाही

By admin | Updated: February 26, 2015 02:53 IST

आरे कॉलनीच्या जमिनीवर मेट्रोचे कारशेड व अन्य शासकीय प्रकल्प वगळता सरसकट बांधकामांना परवानगी दिली जाणार नाही,

मुंबई : आरे कॉलनीच्या जमिनीवर मेट्रोचे कारशेड व अन्य शासकीय प्रकल्प वगळता सरसकट बांधकामांना परवानगी दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्पष्ट केले. बृहन्मुंबईचा विकास आराखडा २०१५च्या वर्षअखेरपर्यंत अंतिम व्हावा, अशी आपली अपेक्षा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.आरेच्या जमिनीवर सरकारी व महापालिकेचे विकासाचे प्रस्ताव गुणवत्तेच्या निकषात बसत असतील तर अमलात आणले जातील. महापालिकेने तयार केलेला हा प्रस्तावित विकास आराखडा अंतिम नाही. यावर लोकांकडून हरकती व सूचना मागवण्यात येतील. त्याची सुनावणी करण्याकरिता स्थायी समिती अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची समिती असेल. त्यांनी घेतलेला निर्णय महापालिका सभागृहापुढे जाईल व मंजूर केला जाईल. त्यानंतर राज्य सरकारची छाननी समिती तो विकास आराखडा तपासून मुख्यमंत्री या नात्याने अंतिम मंजुरीकरिता आपल्याकडे पाठवेल. ही प्रक्रिया वर्षअखेरपर्यंत पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा आहे. सध्या बृहन्मुंबईत वेगवेगळ््या विकास नियंत्रण नियमावली अमलात आणली जाते. पर्यावरण विभागाबरोबर सल्लामसलत करून एकच विकास नियंत्रण नियमावली लागू करण्याचे निर्देश महापालिकेला दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.राज्याचे गृहनिर्माण धोरण ‘यशदा’ला तयार करण्यास सांगितले आहे. त्यावर सर्व विभागांचे अभिप्राय घेतले जातील. राज्य मंत्रिमंडळात गृहनिर्माण धोरण मंजूर झाल्यावर त्यावर हरकती व सूचना मागवण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. संपूर्ण राज्याकरिता एकच विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) धोरण अमलात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. परंतु बृहन्मुंबई व अन्य शहरे यांच्यातील परिस्थितीत फरक असल्याचे फडणवीस यांनी कबुल केले. (विशेष प्रतिनिधी)