शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

आप-भाजपा कार्यकर्त्यांत घोषणायुद्ध

By admin | Updated: June 6, 2016 00:49 IST

ज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या अटकेच्या मागणीसाठी निदर्शने करणाऱ्या आप च्या कार्यकर्त्यांना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली़ बालगंधर्व रंगमंदिरासमोरील कमला

पुणे : राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या अटकेच्या मागणीसाठी निदर्शने करणाऱ्या आप च्या कार्यकर्त्यांना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली़ बालगंधर्व रंगमंदिरासमोरील कमला आर्केडसमोर हा प्रकार घडला. बालगंधर्व रंगमंदिर येथील भारतीय जनता पार्टीच्या उद्योजकता महामेळाव्याला अध्यक्ष अमित शहा आले होते़ आप आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. त्या वेळी कार्यक्रम संपवून बाहेर पडत असलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनीही आपविरुद्ध घोषणाबाजी केली. या वेळी भाजपा कार्यकर्त्यांनी आपचे फलक फाडले, तर काही जणांना मारहाणही करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत आप कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून हलवले. परवानगी दिली नसतानाही निदर्शने करणाऱ्या काही आप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. काँग्रेस आणि आपच्या कार्यकर्त्यांविरुद्ध शिवाजीनगर आणि डेक्कन पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवाजीनगर पोलिसांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी अध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड, गोपाळ तिवारी, दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे, नगरसेवक अरविंदे शिंदे यांच्यासह ७० ते ७५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, तर डेक्कन पोलिसांनी आपच्या मोहनसिंग शामसिंग रजपूत, राजेश तुळशीदास चौधरी, महेश सिद्धेश्वर स्वामी, आनंद नारायण खासनीस, अय्याज सिकंदर सय्यद, अभिजित हिंदुराव मोरे यांच्यासह ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांची परवानगी न घेता निदर्शने करणे, मोठमोठ्याने घोषणा देणे, वाद्य वाजवणे, तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे अशा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सावरकर भवनसमोरील रस्त्यावर आंदोलन करीत भाजपाविरोधी घोषणाबाजी केली. पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना तेथेच अडवून ठेवले होते. या वेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादीही झाली होती. पोलिसांनी काही जणांना ताब्यातही घेतले होते. शहांसमोर काँग्रेसची निदर्शनेपुणे : पक्षाच्या कार्यक्रमांसाठी पुण्यात आलेले भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर काँग्रेसने काळे झेंडे दाखवत निदर्शने केली. ‘गुन्हेगार शहा, चले जाव’च्या घोषणा या वेळी देण्यात आल्या. निदर्शनासाठी ठरवून दिलेली जागा बदलल्याने काँग्रेस कार्यकर्ते व पोलीस यांच्यात बराच वाद झाला, मात्र पोलिसांनी जागा बदलून देण्यास नकार दिला.बालगंधर्व रंगमंदिर येथे रविवारी सकाळी साडेदहा वाजता शहा येणार होते. त्यापूर्वीच काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, पालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेवक अविनाश बागवे, संगीता तिवारी, रमेश धर्मावत, अनिल सोंडकर, अजित दरेकर, शिक्षण मंडळ उपाध्यक्ष नुरुद्दीन सोमजी, माजी महापौर रजनी त्रिभुवन आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांसमवेत काळे झेंडे घेऊन तिथे उपस्थित झाले. त्यांना पोलिसांनी बालगंधर्व चौकातील जागा ठरवून दिली होती, मात्र त्यांचा हा मोर्चा ऐनवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर भवन येथेच अडवण्यात आला. बॅरिकेड्स टाकून सर्वांना तिथेच अडविण्यात आले.बागवे तसेच शिंदे यांनी पोलिसांना ठरलेल्या जागेवर पुढे जाऊ देण्याची विनंती केली, मात्र बंदोबस्तावर असलेल्या स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ती नाकारली. पालकमंत्र्यांच्या सांगण्यावरून पोलीस विश्वासघात करीत असल्याची टीका शिंदे यांनी केली. बंदोबस्तासाठी स्टेनगनधारी पोलीस ठेवल्यावरूनही त्यांनी बापट यांना लक्ष्य केले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोणत्याही मोर्चात कधीही कसली मोडतोड केली नाही. असे असताना अशा प्रकारचा बंदोबस्त ठेवून बापट त्यांच्या पक्षाची संस्कृती दाखवत आहेत, असे ते म्हणाले.पोलिसांनी विनंती नाकारल्यानंतर तिथेच थांबून काँग्रेसने निषेधाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. शहा यांनाच त्यांनी लक्ष्य केले. गुन्हेगार शहा, भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणारे सरकार, अल्पसंख्याकांचा द्वेष करणारे सरकार अशा घोषणा देण्यात येत होत्या. शिंदे यांनी अल्पसंख्याकांचे मारेकरी अशी केंद्र व राज्य सरकारची संभावना केली. दरम्यानच्या काळात शहा यांची गाडी पुढच्या चौकातून बालगंधर्व रंगमदिंराच्या आवारात गेली. त्या वेळी पुन्हा मोठ्याने घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर निदर्शने स्थगित करण्यात आली. (प्रतिनिधी)