शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: 'मी तुमच्या गावाला नक्की येणार'; आमिर खानचा करमाळेवासीयांना शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 23:24 IST

मुंबई पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या राकेश माने यांनी आमिर खान यांच्या घरी जाऊन त्यांना करमाळे येथे येण्याची विनंती केली होती.

- विकास शहा

शिराळा तालुक्यातील करमाळे या गावी 'पाणी फाऊंडेशन'चे  संस्थापक, अभिनेते आमीर खान लवकरच भेट देणार आहेत. स्वतः आमिर खान (Aamir Khan) यांनी याबाबतची माहिती समाज माध्यमातून एका एका ध्वनीचित्रफीतीद्वारे दिली आहे. करमाळे येथील मुंबई पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या राकेश माने यांनी आमिर खान यांच्या घरी जाऊन त्यांना करमाळे येथे येण्याची विनंती केली होती.

करमाळे हे गाव शिराळा तालुक्यातील उत्तर भागातील आहे. भरपूर पाऊस पडत असुनही गेल्या अनेक वर्षांपासून इथे शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. बहुसंख्य लोक मुंबईत कामानिमित्त स्थलांतरित झाले आहेत. वाकुर्डे बुद्रुक योजनेची वाट बघत एक पिढी म्हातारी झाली आहे. गावातील तरूणांनी गाव पाणीदार होण्यासाठी लोकसहभागातून, श्रमदानाने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. जलनायक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीळगंगा नदीच्या पुर्नजीवनासाठी प्रयत्न सुरू आहेत. तीळगंगा नदीचा उगम करमाळ्याच्या महादेव डोंगररांगेत होतो. पुढे सुरूल - ओझर्डे - पेठ मार्गे ही नदी बहे ता.वाळवा येथे कृष्णा नदीला जाऊन मिळते. महाराष्ट्र शासनाच्या यशदा संस्थेने देखील दोन वर्षांपूर्वी याबद्दल पाहणी केली होती. जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील आणि आमदार मानसिंगराव नाईक यांनी देखील करमाळे येथे येऊन वाकुर्डे बु योजनेचे पाणी देण्याच्या दृष्टीने चर्चा केली आहे. पण गाव उंचावर असल्यामुळे वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी करमाळ्याच्या तलावात सोडण्यात अडचणीचे ठरत असल्याचे अधिकारी सांगतात.

आता स्वत: आमिर खान यांनी करमाळे गावाला भेट देणार असल्याचे सांगितले आहे.यामुळे पुन्हा एकदा तीळगंगा नदीच्या पुर्नजीवन चळवळीला उर्जित अवस्था आली आहे. मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे करमाळे गावचे राकेश माने यांनी आमिर खान यांची भेट घेऊन त्यांना गावाला भेट देण्याची विनंती केली होती. या विनंतीनुसार आमिर खान करमाळे येथे येणार आहेत. चित्रीकरणाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे नेमकी वेळ समजू शकलेली नाही.पण तूमच्या गावाला मी नक्की भेट देणार आहे, असे आमिर खान यांनी एका ध्वनीचित्रफीतीद्वारे सांगितले आहे. गावात पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून काम सुरू झाल्यास तीळगंगा नदीचे पुनर्जीवन होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. त्यांच्या येण्याने गावकऱ्यांच्या आशा आता पल्लवीत झाल्या आहेत.

टॅग्स :Aamir Khanआमिर खान