शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पाळला काळा दिवस

By admin | Updated: July 12, 2016 20:29 IST

गेल्या २५ वर्षांपासून देशातील अंगणवाडी सेविका १०जुलै हा अखिल भारतीय मागणी दिवस म्हणून पाळत आहेत.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 12 - गेल्या २५ वर्षांपासून देशातील अंगणवाडी सेविका १०जुलै हा अखिल भारतीय मागणी दिवस म्हणून पाळत आहेत. मात्र यावर्षी केंद्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या निधीमध्ये केलेल्या कपातीमुळे अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या मुंबई जिल्हा समितीने मंगळवारी आझाद मैदानात काळा दिवस पाळला. शिवाय कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आझाद मैदानात निदर्शने केली.सीटू आणि अखिल भारतीय अंगणवाडी सेविका, मदतनीस फेडरेशनच्या आरमायटी इराणी यांनी सांगितले की, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या देश पातळीवरील मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. दर तीन वर्षांनी केंद्र शासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करते. मात्र २०१४ सालापासून शासनाने अपेक्षित मानधनवाढ केलेली नाही. याउलट, केंद्र आणि राज्य सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आयसीडीएसवरील बजेटमध्ये कपात केलीआहे.सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. शिवाय दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्यास आणखी दिरंगाई केल्यास लवकरच आंदोलनाचेहत्यार उपसण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही संघटनेने सांगितले...................

मानधन वाढ कधी करणारअंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना केरळमध्ये अनुक्रमे १० हजार व ७ हजार, हरियाणात ७ हजार ५०० व ३ हजार ७०० आणि इतर राज्यांत अनक्रमे ७ हजार व ३ हजार ५००हून अधिक मानधन मिळत आहे. मात्र, येथील राज्य शासनाने आत्तापर्यंत कर्मचाऱ्यांची आश्वासनावरच बोळवण केली आहे. प्रत्येक वर्षी कर्मचाऱ्यांचे ४ ते ६ महिन्यांचे मानधन थकत आहे....................अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्याकेंद्र शासनाने आयसीडीएस केवळ तात्पुरती योजना म्हणून न राबवता, त्याचे नियमितीकरण करावे व त्याला महिला व बालविकास मंत्रालयांतर्गत उपखात्याचा दर्जा देऊन शासनाचा कायमचा उपक्रम म्हणून राबवावा. सेविका व मदतनिसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतनश्रेणी लागू करावी. सेविकांना १० हजार व मदतनिसांना ७ हजार ५०० मानधन लागू करा.सेविका, मदतनिसांना भविष्यनिर्वाह निधी, पेन्शन, आरोग्यविमा, घरकुलासाठी अनुदान इत्यादी सामाजिक सुरक्षा लागू करा.सेविका, मदतनिसांना वर्षातून १५ दिवसांची पगारी वैद्यकीय रजा व उन्हाळ्याची १ महिन्याची सुट्टी मंजूर करावी. दिवाळीला सेविका, मदतनिसांना सेविकांच्या एका मानधनाइतका समान बोनस देण्यात यावा. मानधन दर महिन्याच्या १० तारखेच्या आत नियमितपणे अदा करण्यात यावे.