शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

आला रे आला ‘ती’चा गणपती

By admin | Updated: September 6, 2016 01:09 IST

नानाविविध साजांनी नटलेल्या गणरायाचे स्वागत ‘ती’च्या हातून होणे यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही.

पुणे : कलाधिपती, बुद्धीची देवता, सर्जनशीलतेचा मूर्तिमंत आविष्कार अशा नानाविविध साजांनी नटलेल्या गणरायाचे स्वागत ‘ती’च्या हातून होणे यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही. उत्सवाची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात लोकमतने ‘तीच्या गणपती’ची संकल्पना रुजवून पुरोगामित्वाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. या गणपतीची वाजतगाजत मिरवणूक काढून स्थापना करण्यात आली.गणेशाची प्रतिष्ठापना आणि पौरोहित्यही विद्याश्री पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आले. पुढील १० दिवस वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवर महिला तसेच आपल्या कर्तृत्वाने यशाची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या महिलांच्या हस्ते तीच्या गणपतीची आरती करण्यात येईल. या वेळी गणेशोत्सवाला धार्मिक महत्त्व असले, तरीही आपण करीत असलेले काम विधायक पद्धतीने करावे, अशी शपथ उपस्थितांनी घेतली.नुकत्याच ब्राझील येथे पार पडलेल्या रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतीय महिलांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेण्यात आली आहे. या महिलांच्या यशाला सलाम करून यंदाचा तीचा गणेशोत्सव या महिला खेळाडूंना समर्पित करण्यात आला आहे. मागील दोन वर्षांपासून लोकमत सखी मंचातर्फे ‘ती’चा गणपती ही अनोखी संकल्पना मांडण्यात आली असून, यंदाही महिलांच्या पुढाकाराने तीचा गणपती हा सार्वजनिक सोहळा उत्साहात साजरा केला जात आहे. कृती, निर्मिती आणि संस्कृतीच्या माध्यमातून उत्सव सर्जनशील आणि कृतिशील व्हावा या संकल्पनेच्या आधारावर लोकमततर्फे गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. दोन वर्षांपासून हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत असून शहरातील सर्व सार्वजनिक मंडळांनीही महिलांना आरतीचा मान द्यावा, असे आवाहन लोकमततर्फे करण्यात आले आहे.या उपक्रमाचे सहप्रायोजक रंगवर्षा सारीज, आयवाना स्पा, ब्यूटी पार्टनर- आयएसएएस, हेल्थ पार्टनर-बिक्रम योगा, फिटनेस पार्टनर-फिटनेस मंत्राज् जिम, नॉलेज पार्टनर- अ‍ॅपटेक कॉम्प्युटर एज्युकेशन बॅँकिंग अँड फायनान्स अ‍ॅकॅडमी, एंटरटेनमेंट पार्टनर- लीड मीडिया अँड पब्लिसिटी प्रा.लि. हे आहेत. ‘लोकमत’च्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘ती’चा गणपतीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. या वेळी एसएनडीटी महाविद्यालयापासून लोकमत कार्यालयापर्यंत ढोल-ताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली होती. नादब्रह्म ढोलताशा ध्वज पथक ट्रस्टच्या वादकांनी अतिशय उत्तम वादन करून उपस्थितांना ठेका धरायला लावला.