शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव टेम्पो रूग्णवाहिकेवर तर रूग्णवाहिका पोलिसांच्या जीपवर आदळली

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: October 17, 2022 21:38 IST

येथील कळमनुरी रोडवरील सावरखेडा परिसरात भरधाव टेम्पो रूग्णवाहिकेवर तर रूग्णवाहिका पोलिसांच्या जीपवर आदळून विचित्र अपघात झाला.

हिंगोली :

येथील कळमनुरी रोडवरील सावरखेडा परिसरात भरधाव टेम्पो रूग्णवाहिकेवर तर रूग्णवाहिका पोलिसांच्या जीपवर आदळून विचित्र अपघात झाला. ही घटना १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. यात पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्यासह रूग्णवाहिकेतील गरोदर महिलेला किरकोळ मार लागला. 

हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे हे सोमवारी सायंकाळच्या सुमारास कर्मचाऱ्यासह जीपने कळमनुरीकडे जात होते. पोलिसांच्या जीपच्या मागे  रूग्णवाहिका येत होती. दोन्ही वाहने कळमनुरीकडे जात होती. याच वेळी एका टेम्पो चालकाने वाहन भरधाव चालवून रूग्णवाहिकेला जोराची धडक दिली. यामुळे रूग्णवाहिका पुढे पोलिसांच्या वाहनांवर आदळली. यात पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या डोक्याला किरकोळ मार लागला. तसेच रूग्णवाहिकेतील गरोदर महिलेसही मार लागला. तसेच तिन्ही वाहनांचे नुकसान झाले. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

जखमी पोलीस निरीक्षक कच्छवे धावले मदतीलादरम्यान, रूग्णवाहिकेतून एका गरोदर महिलेस नांदेड येथील रूग्णालयात नेले जात होते. मात्र भरधाव टेम्पो रूग्णवाहिकेवर आदळला. यात गरोदर महिलेसही किरकोळ मार लागला. पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांना अपघातात मार लागलेला असतानाही त्यांनी रूग्णवाहिका बोलावून घेतली. त्यांनी कर्मचाऱ्याच्या मदतीने गरोदर महिलेस रूग्णवाहिकेत बसवून नांदेड येथे तत्काळ रूग्णालयात पाठविले.

टॅग्स :Hingoliहिंगोली