शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांचा ओघ वाढावा यासाठी विशेष उपक्रम, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचा शासनासह पुढाकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 09:01 IST

विशेष उपक्रमांतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात राज्यातील अल्प प्रतिसाद असलेल्या पर्यटन स्थळांचा अभ्यास करण्यात येईल.

मुंबई : पर्यटनाची पारंपरिक व्याख्या बदलण्याच्या दृष्टीने आता केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने नवा उपक्रम जाहीर केला आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालय राज्य शासनाच्या पर्यटन विभागासह आता अल्प प्रतिसाद असलेल्या पर्यटन स्थळांवर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. 

विशेष उपक्रमांतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात राज्यातील अल्प प्रतिसाद असलेल्या पर्यटन स्थळांचा अभ्यास करण्यात येईल. यात कांदळवनांपासून ते ऐतिहासिक स्थळांचाही समावेश करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, या पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी क्षेत्रातील अन्य घटकांसह स्थानिक प्रशासनालाही यात समाविष्ट करण्यात येणार आहे.

पर्यटकांचा ओढा वाढावा यासाठी अशा पर्यटन स्थळांवर पायाभूत सुविधा, निवास, पर्यटन सुविधा, पर्यटकांचा या भागात होणारा ओघ, प्रवास आणि पर्यटनाची शाश्वतता, जबाबदार पर्यटन, स्थानिक समुदायाचा सहभाग, संवेदना आणि सेवा पुरवठादारांचे प्रशिक्षण यासह विविध पैलूंवर भर देण्यात येणार आहे.

वर्षभर विविध उपक्रमांवर भरराज्याला सुमारे ७२० किमीचा समृद्ध समुद्रकिनारा लाभला आहे. तसेच राज्यभरात उत्कृष्ट प्राचीन मंदिरे, अजिंठा वेरूळ सारखी लेणी, वन्यजीव, थंड हवेची ठिकाणे, धार्मिक स्थळे ही पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची स्थाने आहेत. प्रदेशनिहाय असलेल्या वैशष्ट्यपूर्ण कृषी आणि खाद्य संस्कृती पर्यटकांना भुरळ घालत असतात. नैसर्गिक व ऐतिहासिक पर्यटनाबरोबरच औद्योगिक, आरोग्य, नव्याने शैक्षणिक अन्य क्षेत्रात करत उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्राकडे पर्यटकांचा ओघ वाढत आहे. त्यामुळे आगामी काळात वर्षभर या उपक्रमावर काम केले जाणार आहे. यासाठी पर्यटन क्षेत्रातील विविध काम करणा-या संस्था व शासन यांमध्ये समन्वयाने महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे जागतिक पातळीवर नेण्याचा मानस असल्याची माहिती पर्यटन विभागाने दिली.

टॅग्स :tourismपर्यटन