शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

खासगी अनुदानित शाळांना शासकीय दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 06:51 IST

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

पुणे : राज्यातील खासगी अनुदानित शाळांचा दर्जा घसरलेला आहे. या शाळांचा शंभर टक्के खर्च हा राज्य सरकार उचलते. या शाळांना शासकीय दर्जा मिळाला, तर त्यांच्यासाठी केंद्र शासनाच्या योजना राबविता येतील. त्यामुळे आम्ही खासगी अनुदानित शाळांना शासनाच्या शाळा गृहीत धरून त्यांना मदत करावी, असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांना दिली. 

केसरकर म्हणाले, राज्यातील अनुदानित शाळांना खासगी असा दर्जा मिळाल्याने त्यांना  केंद्र शासनाची मदतही मिळू शकत नाही. या शाळांना शासकीय दर्जा मिळाला, तर त्यांच्यासाठी केंद्र शासनाच्या योजना राबविता येतील. हा प्रश्न केवळ गुजरात, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र, अशा तीन राज्यांत आहे. 

राज्यात शिक्षक भरतीचा मार्ग मोकळाऔरंगाबाद उच्च न्यायालयाने शिक्षक भरतीला स्थगिती दिली होती. त्यामुळे भरती प्रक्रिया लांबली होती.  त्यामुळे काही शाळांमध्ये शिक्षक नसल्याची स्थिती आहे. न्यायालयाने स्थगिती उठविल्याने शिक्षक भरतीला सुरुवात होणार आहे. राज्यात ५० हजार शिक्षक भरती करणार, त्यातील ३० हजार शिक्षकांची भरती ही पहिल्या टप्प्यात, तर दुसऱ्या टप्प्यात २० हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे.  

राज्यातील सर्व शाळांमध्ये वेब कॅमेरे बसविणार आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारा राज्यातील सर्व शाळांमध्ये वेब कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढील काळात सर्व शाळांवर राज्याच्या शिक्षण विभागाचे थेट नियंत्रण असणार आहे. केबीसीमध्ये जसा प्रेक्षकांच्या हाती रिमोट देऊन कुणी ते बटन दाबले आहे नि कोणता पर्याय दिला आहे, हे दिसते. हेच तंत्रज्ञान मुलांच्या हातात असेल. मुले उत्तर देतील आणि त्यांचे अचूक मूल्यमापन होईल.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ट्विट गांभीर्याने घेऊमहाराष्ट्र हा परफॉर्मिंग इंडेक्समध्ये सातव्या क्रमांकावर गेला, असा गैरसमज निर्माण झाला आहे. तो चुकीचा आहे. पूर्वीचे निकष बदलले आहेत. प्रत्येक राज्याची ९० टक्क्यांवरची कामगिरी घसरली होती. त्यामुळे नवीन निकषामध्ये पहिल्या पाचमध्ये एकही राज्य बसू शकले नाही; पण शरद पवार यांनी केलेले ट्वीट गांभीर्याने घेतले जाईल. आज महाराष्ट्र मॉडेल देशात वापरले जात आहे.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Central Governmentकेंद्र सरकार