शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

ऐन पावसाळ्यात महाराष्ट्रात दुष्काळाची चाहूल? सावित्रीसह काळ नदीने तळ गाठला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 11:25 IST

आठवडाभरापासून पावसाची दांडी; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क महाड : जुलै महिन्यात धोकादायक वाटणारा पाऊस अचानक गायब झाल्याने तालुक्यातील नद्यांनी तळ गाठला आहे. जवळपास आठवडाभरापासून पावसाने दांडी मारल्याने वातावरणात निर्माण झालेल्या उष्म्याने नागरिक हैराण झाले आहेत. तर कडक उन्हाने शेतकरीदेखील चिंतित आहेत. कोकणातील भौगोलिक स्थितीनुसार पावसाचे पडणारे पाणी पाऊस थांबताच थेट नदीला जाऊन मिळते. यामुळे बहुतांश नद्या आणि नाले कोरडे पडू लागले आहेत.

महाडसह संपूर्ण कोकणात पावसाचे प्रमाण अधिक आहे. महाड आणि पोलादपूरमध्ये तर पावसाची मुसळधार असते. दोन्ही तालुक्यात सरासरी ३ ते ४ हजार मिमी पावसाची नोंद होते. तालुक्यातील उंच भागात पावसाचे प्रमाण यापेक्षा वेगळे आहे. महाड तालुक्याच्या शेजारी असलेल्या महाबळेश्वरमधील पावसाचे प्रमाण याहून अधिक असल्याने येथील पावसाच्या पाण्याचा प्रभाव महाड आणि पोलादपूरमध्ये जाणवतो. जुलै महिन्यात नदीच्या पाण्याची पातळी सातत्याने पडणारा पाऊस कमी होऊन देत नाही. मात्र यावर्षी पावसाने अचानक दांडी मारल्याने महाड तालुक्यातील नद्यांनी तळ गाठला आहे. 

जून महिन्यात पाऊस उशिराने सुरू झाल्याने आणि जुलै महिन्यातदेखील पावसाने मारलेली दांडी यामुळे शेतकऱ्यांच्या भातलावणीदेखील लांबणीवर गेली. शेतकरी भाताची रोपे करपतात की काय, या भीतीने चिंतेत सापडले आहेत. नद्यांनी  तळ गाठल्याने दुष्काळाची चाहूल करून दिली की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाड तालुक्यातून सावित्री, गांधारी आणि काळ या नद्या ऐन पावसाळ्यात तुडुंब भरून वाहतात. मात्र पाऊस कमी होताच तत्काळ तळ गाठतात. 

जूनमध्ये महाड तालुक्यात अवघा२९९ मिमी पावसाची नोंद झाली. तर जुलै महिना संपल्यानंतर अवघ्या १६९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे तालुक्यातील कोथुर्डे, आंबिवली, कुर्ले, धरणातील पाणीसाठा पाऊस थांबताच कमी झाला आहे. ओसंडून वाहणारी धरणे आता मंदावली आहेत. ग्रामीण भागातील नद्यानाल्यांची पातळी कमी झाली असल्याने आणि पावसाचे प्रमाण असेच राहिले तर पिण्याच्या पाण्याचे स्रोत लवकरच आटून जातील अशी भीती वर्तवली जात आहे. कोकणात भातपिकाला लागणारा पाऊस, पिण्याचे पाण्याचे स्रोत मे महिन्यापर्यंत टिकायचे असतील तर पावसाचे प्रमाणातील सातत्य कायम राहणे गरजेचे आहे.

पावसाची आकडेवारीमहाड तालुक्यात २००५ मध्ये एकूण पावसाची नोंद ४२२३ मिमी, तर २००७ मध्ये ५८९९ मिमी, २०१९ मध्ये ४३९६ मिमी, २०२० मध्ये ३४४८ मिमी, २०२१ मध्ये ३४२० मिमी पाऊस झाला आहे. गेला आठवडाभर महाड तालुक्यात २० मिमीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ