मेहकर : खासगी बस आणि कारची समाेरासमाेर धडक झाल्याने तिघेजण जागीच ठार झाले तर दाेघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना २३ एप्रिल राेजी सकाळी नागपूर - मुंबई महामार्गावर खामखेड बसस्थानकाजवळ घडली. इंदल चव्हाण (३८), योगेश विसपुते (२४), विशाल विसपुते (३४) अशी मृतकांची नावे आहेत.चाळीसगाव येथील पाचजण कार क्रमांक (एमएच ०६, डब्ल्यू ५१३४)ने आर्णी येथे जात हाेते. दि. २३ एप्रिल राेजी पहाटे ३ वाजता नागपूर - मुंबई महामार्गावर खामखेड बसस्थानकाजवळ खासगी बस क्रमांक (एमएच ४०, बीएल ७०६१) व कारची समाेरासमाेर धडक झाली. यामध्ये इंदल चव्हाण, योगेश विसपुते, विशाल विसपुते हे जागीच ठार झाले तर चालक ज्ञानेश्वर रघुनाथ चव्हाण व मिथुन रमेश चव्हाण हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने बुलडाणा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला.
खासगी बस आणि कारची समाेरासमाेर धडक; तीन ठार, दाेन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2022 17:02 IST
Accident News : इंदल चव्हाण (३८), योगेश विसपुते (२४), विशाल विसपुते (३४) अशी मृतकांची नावे आहेत.
खासगी बस आणि कारची समाेरासमाेर धडक; तीन ठार, दाेन गंभीर
ठळक मुद्देखामखेड बसस्थानकाजवळील घटना मृतक चाळीसगाव येथील