शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

भंगारात सापडलेला ८ लाख किंमतीचा १० तोळे सोन्याचा हार; मजुरानं दाखवला प्रामाणिकपणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 09:20 IST

भंगारात सापडलेला १० तोळ्यांचा हार परत केला; हरितालिकेबरोबर चुकून झाले होते विसर्जन

कऱ्हाड (जि. सातारा) - नदीकाठी भंगार गोळा करणाऱ्या नूरजहाँ फकीर या महिलेला कऱ्हाडातील प्रीतिसंगम घाटावर तब्बल दहा तोळ्यांचा सोन्याचा राणीहार सापडला. लाखो रुपयांचा हा ऐवज हातात आल्यानंतर कुणाचीही नीतिमत्ता डगमगली असती. मात्र, हातावर पोट असणाऱ्या त्या महिलेने प्रामाणिकपणा जपत सोनाराच्या माध्यमातून तो राणीहार पोलिसांकडे सुपूर्द केला. तसेच पोलिसांनी तो हार मालकाला परत केला.

गोटे (ता. कऱ्हाड) येथील अधिकराव दिनकर पवार हे आपल्या कुटुंबासमवेत ७ सप्टेंबर रोजी हरितालिका मूर्ती विसर्जन करण्यासाठी कऱ्हाडातील प्रीतिसंगम घाटावर आले होते. कृष्णा नदीपात्रात हरितालिका मूर्ती विधिवत विसर्जन करत असताना त्यांच्याकडून चुकून ८ लाख ३० हजार रुपये किमतीचा सोन्याचा राणीहारदेखील नदीपात्रात विसर्जन झाला होता. मात्र ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली नाही.

दहा हजारांचे बक्षीस देऊन नूरजहॉं यांचा गौरव

नूरजहाँ फकीर यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांना दहा हजार रुपये रोख व यावेळी त्यांच्यासोबत असणाऱ्या महिलांना साडी देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच सराफ व्यावसायिक निसार सय्यद यांचाही गौरव करण्यात आला.

घबाड पोलिस ठाण्यात केले जमा

दरम्यान, चार दिवसांनी ११ सप्टेंबर रोजी शिवाजी स्टेडियमजवळ राहणाऱ्या नूरजहाँ फकीर या प्रीतिसंगम घाट परिसरात भंगार गोळा करत असताना त्यांना राणीहार दिसला. त्यानंतर नूरजहाँ यांनी तो ओळखीचे सराफ व्यावसायिक निसार सय्यद यांच्याकडे आणून दिला. निसार सय्यद यांनी याची माहिती माजी नगरसेवक सिद्धार्थ थोरवडे यांना दिली. त्यानंतर तिघेही कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात आले आणि हार जमा केला. पोलिसांनी अधिकराव पवार यांना बोलावून राणीहार त्यांच्याकडे दिला.