शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खर्च न दिल्याने ९२ जण अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2017 02:08 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक लढविणाऱ्या ७७६ उमेदवारांपैकी तब्बल ९२ उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केला नसल्याची बाब उघडकीस आली

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक लढविणाऱ्या ७७६ उमेदवारांपैकी तब्बल ९२ उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केला नसल्याची बाब उघडकीस आली आहे. या उमेदवारांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात झाली. यंदाची निवडणूक चार सदस्यीय प्रभागरचनेनुसार झाली. निवडणुकीसाठी १२८ वॉर्ड आणि ३२ प्रभाग होते. या प्रभागातील जागांकरिता ७७६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. प्रभागपद्धतीने निवडणूक असल्याने आणि प्रभाग मोठ्या प्रमाणावर असल्याने अपक्ष उमेदवारांचे प्रमाण निम्म्याने घटले होते. मिनी आमदारकी एवढे कार्यक्षेत्र एका प्रभागाचे होते. त्यामुळे अधिकृत पक्षाची उमेदवारी न मिळणाऱ्या अनेक इच्छुकांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरणे टाळले. त्यामुळे निवडणूक रिंगणातील एकूण संख्येवरही परिणाम दिसून आला. निवडणूक लढविलेल्या या सर्व उमेदवारांना राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणुकीत झालेला खर्च सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. तसेच आॅनलाइन खर्च सादर करण्याचीही सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली होती. (प्रतिनिधी)सर्वाधिक उमेदवार भोसरीतील प्रभाग क्रमांक ४, ५ व ७ मधील १९, थेरगावातील २२, २३, २७ या प्रभागांतून १६, तर प्रभाग क्रमांक १, २ आणि ११ मधील ११ उमेदवारांनी मुदतीत निवडणूक खर्च सादर केला नाही. प्रभाग क्रमांक २८, २९, ३० मधील केवळ एका उमेदवाराने निवडणूक खर्च सादर केला नाही.