शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

ग्रामविकासासाठी ९,२८० कोटींची तरतूद; पायाभूत सुविधांचा विकासांना प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 07:51 IST

राज्यात पायाभूत सुविधा उभारताना दळणवळणावर अधिक भर देण्यात आला आहे.

राज्यात पायाभूत सुविधा उभारताना दळणवळणावर अधिक भर देण्यात आला आहे. रस्त्यांचा विकास, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर,  नागपूर येथील मिहान प्रकल्प, कोल्हापूर विमानतळ, अमरावती, नवी मुंबई विमानतळाच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. 

रस्ते विकासnस्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूचा विस्तार पालघरपर्यंत, विलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्गाचा विस्तार ठाणे शहरापर्यंत करण्यात येणार आहे.nविरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गाकरिता भूसंपादनासाठी २२ हजार २२५  कोटी रुपयांची तरतूदnपुणे चक्राकार वळण मार्गाच्या भूसंपादनासाठी १० हजार ५१९ कोटींची तरतूदnजालना-नांदेड द्रुतगती  महामार्गाच्या भूसंपादनासाठी २ हजार ८८६ कोटींची तरतूद.nसन २०२४-२५ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता नगरविकास विभागाला १० हजार ६२९  कोटी रुपयेnसार्वजनिक बांधकाम (रस्ते) विभागाला १९ हजार ९३६ कोटी रुपये नियतव्यय मंजूरnमहाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत ॲन्युईटी योजना भाग-२ अंतर्गत ७ हजार ५०० किलोमीटर रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत.nमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा २ मधील १० हजार किमी रस्त्यांव्यतिरिक्त ७,६०० कोटी खर्चून ७ हजार कि.मी.च्या रस्त्यांची दर्जोन्नती केली जाणार आहे.

बंदर विकासाला चालना जेएनपीटीचे सॅटेलाइट पोर्ट म्हणून वाढवण बंदर विकास प्रकल्पात महाराष्ट्र सागरी मंडळाचा २६ टक्के सहभाग. या प्रकल्पाची एकूण किंमत ७६ हजार २२० कोटी रुपये एवढी आहे.जिल्ह्यातील भगवती बंदर विकासासाठी ३०० कोटी रुपये, रायगड जिल्ह्यातील सागरी दुर्ग जंजिरा १११ कोटी रुपये, मुंबईतील एलिफंटा येथे ८८ कोटी रुपयांची बंदर विकासाची कामे हाती घेण्यात येणारसागरमाला योजनेअंतर्गत मुंबईत गेट वे ऑफ इंडियालगत रेडिओ क्लब येथे सुसज्ज जेट्टीसाठी २२९ कोटी २७ लाखांची तरतूद. 

रेल्वे प्रकल्पचिमूर-वरोरा, जालना-जळगाव आणि नांदेड-बिदर या नवीन रेल्वेमार्गांकरिता ५० टक्के आर्थिक सहभाग. आदिलाबाद-माहूर-वाशिम, शकुंतला रेल्वे ५० टक्के आर्थिक सहभाग देणार. 

विमानतळ विस्तारशिर्डी विमानतळाच्या टर्मिनलचे काम सुरू करणार, छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाच्या भूसंपादनासाठी ५७८ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा