शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद अखेर बडोद्याकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 23:27 IST

91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नव्या यजमानाची घोषणा अखेर झाली आहे. आता बृहृमहाराष्ट्रातील एक प्रमुख शहर असलेल्या गुजरातमधील बडोद्यात 91व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सारस्वतांचा मेळा भरणार आहे.

मुंबई, दि. 18 - 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नव्या यजमानाची घोषणा अखेर झाली आहे. आता बृहृमहाराष्ट्रातील एक प्रमुख शहर असलेल्या गुजरातमधील बडोद्यात 91व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सारस्वतांचा मेळा भरणार आहे. बडोद्याला चौथ्यांदा साहित्य संमेलनाच्या यजमानपदाचा मान मिळाला असून, तब्बल 83 वर्षांनंतर प्रथमच बडोद्यात मराठी साहित्य संमेलन आयोजित होणार आहे. 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद याआधी बुलडाणा जिह्यातील हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रमाला देण्यात आले होते. मात्र शुकदास महाराजांवर अनिंसने केलेल्या आरोपांनंतर हिवरा येथील विवेकानंद आश्रमाने संमेलनाच्या यजमानपदापासून माघार घेतली होती. गुजरातमधील प्रमुख शहर असलेल्या बडोद्यामध्ये मराठी भाषिकांचे प्रमाण लक्षणीय आहे. तसेच गायकवाड राजघराण्यामुळे या शहराचे महाराष्ट्राशी अनेक शतकांपासून राजकीय नाते आहे. डोद्यात होणारे हे चौथे साहित्य संमेलन असणार आहे. यापूर्वी 1909 यावर्षी सातवे संमेलन, 1921 या वर्षी अकरावे संमेलन व 1934 या वर्षी विसावे संमेलन या ठिकाणी घेण्यात आली होती. त्यावेळी अनुक्रमे का. र. कीर्तीकर, न.चिं.केळकर, ना.गो. चापेकर हे बडोद्याच्या संमेलनाचे अध्यक्ष होते. मात्र स्वातंत्र्योत्तर काळात बडोद्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन झालेले नाही. आता हिवरा आश्रमाने माघार घेतल्याने तब्बल 83 वर्षांनंतर बडोद्याला मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा मान मिळाला आहे.   हिवरा येथील विवेकानंद आश्रमाने संमेलनाच्या यजमानपदापासून माघार घेतली होती. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कायम संस्थानिकांचेच बटीक असावे, असे ज्या अदृश्यशक्तींना वाटते, त्या शक्तींनीच विवेकानंद आश्रम व पूज्यनीय शुकदास महाराज यांच्या बदनामीची मोहीम उघडली. त्यामुळे अनेकांची नाराजी झाली आहे. या बदनामीमुळे ९१ वे साहित्य संमेलन विवेकानंद आश्रम येथे घेण्यासाठी अखिल भारतीय साहित्य महामंडळाकडे पाठविलेला प्रस्ताव मागे घेत असल्याचे विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष रतनलाल मालपाणी यांनी गेल्या आठवड्यात गुरूवारी स्पष्ट केले होते. भाषा, साहित्य, संस्कृतीचा प्रचार व प्रसार हाच साहित्य संमेलनाचा पवित्र हेतू आहे, हा हेतूच सफल होऊ शकत नसेल तर आणखी ताणून धरण्यात काय हाशील आहे? त्यामुळे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा प्रस्ताव आम्ही मागे घेत आहोत, असेही मालपाणी यांनी जाहीर केले. 

टॅग्स :Gujaratगुजरात