शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात 9 गंभीर

By admin | Updated: April 30, 2017 10:45 IST

मुंबईत मध्यरात्रीच्या सुमारात दादर- माटुंगा उड्डाणपुलावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 30 - मुंबईत मध्यरात्रीच्या सुमारास दादर- माटुंगा उड्डाणपुलावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या स्कॉर्पिओ कार आणि ट्रकच्या झालेल्या अपघातात आतापर्यंत 9 जण गंभीर स्वरूपात जखमी झाल्याचीही प्राथमिक माहिती मिळाली आहे. जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमीपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचीही प्राथमिक माहिती समजली आहे. मात्र अपघाताचं कारण अद्यापही समजलं नाही, पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

मित्राच्या बर्थडे पार्टीसाठी स्कॉर्पिओने भांडुपहून मरिन ड्राइव्हला भरधाव वेगात निघालेल्या 9 मित्रांना ही पार्टी भलतीच महागात पडली आहे. बर्थडे पार्टीच्या जोशात स्कॉर्पिओ चालकाचा गाडीवरचा ताबा सुटून गाडी डिव्हायडरवरून दुसऱ्या लेनवर आली आणि सायनच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकवर आदळून अपघात झाला. या भीषण अपघातात गाडीचा चुराड़ा झाला असून, ट्रक चालकासह 9 जण जखमी झाले आहेत. यापैकी तिघांची प्रकृति चिंताजनक आहे.माटुंगा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास हा अपघात घडला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना सायन आणि फोर्टिस रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी स्कॉर्पिओ चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ज्याने बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते तो यात गंभीर जखमी आहे. तर बर्थडे बॉय यातून थोडक्यात बचावला असल्याची माहिती माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. एम. काकड यांनी दिली आहे.