शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
3
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
4
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
5
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
6
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
7
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
8
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
9
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
10
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
11
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
12
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
13
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
14
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
15
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
16
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
17
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
18
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
19
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
20
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?

राज्यात नऊ नवी शहरं, सहा जागी विमानतळ!

By admin | Updated: January 25, 2015 02:36 IST

मुंबई-दिल्ली इंडस्ट्रीयल कॉरिडोरमुळे राज्याच्या विकासाला बुस्टर डोस मिळणार असून, राज्यात नऊ नवी शहरे आणि सहा विमानतळे उभी राहणार आहेत.

डीएमआयसीचे बुस्टर : विकासाला गती देण्यास राज्य सरकार सरसावलेनारायण जाधव - ठाणेसंयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने देशाच्या विकासासाठी घोषित केलेल्या अन् महाराष्ट्रासह सहा राज्यांतून जाणाऱ्या प्रस्तावित १४८३ किलोमीटर लांबीच्या मुंबई-दिल्ली इंडस्ट्रीयल कॉरिडोरमुळे राज्याच्या विकासाला बुस्टर डोस मिळणार असून, राज्यात नऊ नवी शहरे आणि सहा विमानतळे उभी राहणार आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती देण्यास राज्य सरकारने औद्योगिक शहरांसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या विशेष हेतू कंपन्यांसाठी सवलती जाहीर केल्या. ११ जिल्ह्यांना जोडणारा १५० किमी लांबीचा डीएमआयसीचा हा मार्ग असून, त्याचा चार टप्प्यांत विकास करण्यात येणार आहे. केंद्रीय उद्योग मंत्रालयाने दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोर कॉर्पोरेशन तर राज्यात एमआयडीसीची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली. या प्रकल्पात ज्या ज्या ठिकाणी औद्योगिक नगरी क्षेत्र घोषित होईल, त्यांंना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकार क्षेत्रातून वगळण्यात येणार आहे.राज्यांतून जाइल कॉरिडोर : महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान.जिल्हे : मुंबई, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, अहमदनगर, धुळे, नंदुरबार व औरंगाबाद़बंदरे, औद्योगिक क्षेत्रांसह बऱ्याच ठिकाणांचा विकासयात जेएनपीटी, बीपीटी आणि दिघी ही बंदरे, औरंगाबादचे शेंद्रा एमआयडीसी अन् कन्व्हेन्शन सेंटर, कार्ला येथील मल्टी नोडल लॉजिस्टिक पार्क, मुंबई-नाशिक-पुणे- औरंगाबाद ट्रान्सपोर्ट अ‍ॅण्ड टेलीकम्युनिकेशन कॉरिडोर विकसित करण्यात येणार आहेत़प्रकल्पातील कंपन्यांना अशा मिळतील सवलतीच्प्रकल्पांना महापालिकांसह आणि शासनाने मालमत्ताकरासह इतर करांत माफी देण्यात येणारच्पायाभूत सुविधांसाठी आवश्यक परवानग्या व सुविधा तत्काळ देणारच्प्रकल्पांसाठी एमआयडीसीकडून होणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनावर किंवा विशेष हेतू कंपनीकडून विकत घेणाऱ्या जमिनींच्या व्यवहारावर मुद्रांक शुल्क माफ करण्यात येणारच्जमीन संपादनासाठी आवश्यक तेव्हा, आवश्यक तेवढा पोलीस बंदोबस्त देण्याचे राज्य शासनाने कबूल केले आहे़च्विशेष हेतू कंपनीस महाराष्ट्र नगररचना कायदा १९६६ च्या कलम (४०) १ नुसार विशेष नगर नियोजन प्राधिकरणाचे अधिकार देण्यात येणार असून, त्यासाठी या कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहेत.च्यात स्थापन झालेल्या औद्योगिक क्षेत्रात पाणी, वीज, रस्ते, विशेष हेतू कंपनी, तर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी राज्य पोलिसांकडेच्औद्योगिक नगरीत जन्म, मृत्यू नोंद आणि आरोग्यसेवा पुरविण्याचे अधिकार विशेष हेतू कंपनी दिले आहेत़हे आहेत राज्यातील चार टप्पे1 धुळे-नरडाणा-इंदूर गुंतवणूक क्षेत्र : सूरत - कोलकाता, मुंबई -आग्रा, धुळे सोलापूरशी कनेक्टिव्हिटी, नरडाणाच्या टेक्सटाइल्स पार्कचा होणार विकास2 इगतपुरी-नाशिक-सिन्नर गुंतवणूक क्षेत्र : मुंबई-कल्याण-इगतपुरी-मनमाड-जळगाव ट्रंक रोड, एक्सपोर्ट ओरिएंटेड इंडस्ट्रीयल सेझ, सिन्नर भागात लॉजिस्टिक हब, टाऊनशिप, नाशिक विमानतळाचा विकास, इगतपुरी-अकोला-संगमनेर हाय वेशी जोडणार.3पुणे-खेड औद्योगिक क्षेत्र : अ‍ॅग्रो प्रोसेसिंग युनिटचा विकास, द्राक्ष निर्यातीस प्रोत्साहन, इंजिनीअरिंग सेझचा विकास, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासास गती, पुणे-नाशिक, पुणे-चेन्नई आणि हैदराबाद-विजयवाडा हाय वेशी कनेक्टिव्हिटीचा विकास4दिघी बंदरातील औद्योगिक क्षेत्र : दिघी येथील ग्रीनफिल्ड पोर्टच्या विकासात चालना देऊन परिसर मुंबई, जेएनपीटी, बंदरांसह विरार-अलिबाग कोस्टल रोडशी कनेक्टिव्हिटी, कंटेनर टर्मिनल, निवासी व इंडस्ट्रीयल एकात्मिक टाऊनशिप विकसित करणे.