सांगली : फटाके निर्मितीच्या कारखान्यात शोभेच्या दारूचा ‘आऊट’ तयार करताना झालेल्या भीषण स्फोटात नऊजण जागीच ठार, तर चौघे गंभीर जखमी झाले़ ही घटना कवठेएकंद येथील ‘ईगल फायर वर्क्स’ मध्ये सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. कारखाना जमीनदोस्त झाला. स्फोटामुळे १५ किलोमीटरचा परिसर हादरला. मृतांपैकी दोघांची रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती. जखमींची प्रकृतीही चिंताजनक आहे. स्फोटात कारखाना जमीनदोस्त झाला असून, बांधकामातील अवशेष विखरून सुमारे दीडशे फुटांवर जाऊन पडले. स्फोटामुळे १५ किलोमीटरचा परिसर हादरला. मृतांमध्ये सुनंदा रामचंद्र गिरी (४५) , अनिकेत रामचंद्र गुरव (१६), इंदुबाई तुकाराम गुरव (७०), जुबेदा अकबर नदाफ (५५), राजेंद्र रामचंद्र गिरी (२२), तानाजी ईश्वर शिरतोडे (३२), अजित निशिकांत तोडकर (३२), शरद शिवाजी गुरव (३८), रामचंद्र गिरी (४८) यांचा समावेश आहे. जखमी शिवाजी तुकाराम गुरव (४६) यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तासगाव तालुक्यातील कवठेएकंदपासून तीन किलोमीटर अंतरावर शिवाजी गुरव यांचा ईगल फायर वर्क्स हा फटाके निर्मितीचा कारखाना आहे. दोन तासांनंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. ‘आऊट’ने घेतले जीवशोभेच्या दारूचा आऊट तयार करताना थोडी जरी चूक झाली तरी त्याचा स्फोट होतो, असे ग्रामस्थांनी सांगितले. (प्रतिनिधी)
फटाक्यांच्या स्फोटात नऊ ठार
By admin | Updated: May 5, 2015 02:20 IST