शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

८८ टक्के फायली निकाली काढल्या

By admin | Updated: November 28, 2015 01:47 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या खात्यांशी संबंधित ८८ टक्के फायली या निकाली काढण्यात आल्या असून, केवळ १२ टक्के फायलींवर निर्णय व्हायचा आहे.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या खात्यांशी संबंधित ८८ टक्के फायली या निकाली काढण्यात आल्या असून, केवळ १२ टक्के फायलींवर निर्णय व्हायचा आहे. या १२ टक्क्यांमध्ये धोरणात्मक बाबींशी संबंधित एकही फाईल नसून, त्यात समिती गठन वा नियुक्तींशी संबंधित प्रकरणे आहेत, असे मुख्यमंत्री कार्यालयाने आज स्पष्ट केले. ‘सीएमओ’ कार्यालयात तुंबल्या फायली’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये २७ नोव्हेंबरच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या वृत्तावर मुख्यमंत्री कार्यालयाने आज स्पष्टीकरण देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या सामान्य प्रशासन विभागाच्या १५६५पैकी १४२५ फायलींवर निर्णय घेण्यात आले आहेत. स्वातंत्र्यसैनिक कल्याण विभागाशी संबंधित ३४४ फायलींपैकी ३१४ फायलींवर निर्णय झाला आहे. माहिती व जनसंपर्क खात्याशी संंबंधित १४पैकी १२ फायलींवर निर्णय झालेला आहे. गृह खात्याच्या १११९ फायलींपैकी १०१२ फायलींवर निर्णय झाला आहे. तर बंदरे विभागाच्या ६७ फायलींपैकी ५९ फायली निकाली काढण्यात आलेल्या आहेत. विधी व न्याय विभागाच्या ५२८ फायलींपैकी ३७९ फायलींवर तर नगरविकास खात्यापैकी १७५५ फायलींपैकी १५१२ फायलींवर निर्णय झालेला आहे. अशा एकूण ५३९२ फायली मुख्यमंत्र्यांकडील खात्यांशी संबंधित असून, ४७१३ फायलींवर निर्णय झालेले आहेत. केवळ ६७९ फायली शिल्लक आहेत. फाईल्सवर निर्णय घेण्याची ही टक्केवारी ८८ टक्के इतकी आहे. याशिवाय अन्य विभागांच्या फायलीसुद्धा मुख्यमंत्र्यांकडे येत असतात, असेही मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)