जळगाव जामोद (जि. बुलडाणा) : जामोद येथील दंगलप्रकरणी पोलिसांनी अटकसत्र सुरू केले असून ८७ जणांना अटक करण्यात आली आहे. शनिवार रात्रीपासून लागू करण्यात आलेली संचारबंदी रविवारीही कायम होती. श्रीराम नवमीनिमित्त आयोजित महाप्रसादाचा ट्रॅक्टर अडविल्याच्या कारणावरून शनिवारी रात्री ८च्या सुमारास जातीय तणाव निर्माण होऊन दगडफेक व जाळपोळीचे प्रकार घडले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला होता. रात्री उशिरा परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्यानंतर गावात संचारबंदी लागू करण्यात आली. आज दिवसभर संचारबंदी लागू केली होती.
बुलडाण्यातील दंगलप्रकरणी ८७ जणांना अटक
By admin | Updated: April 18, 2016 01:13 IST