शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सहा महिन्यांत ८६५ लाचखोर गजाआड

By admin | Updated: July 2, 2015 03:45 IST

लाचखोर अधिकाऱ्यांना आळा बसावा यासाठी यावर्षी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) अधिक कडक कारवाई करत अवघ्या सहा महिन्यात तब्बल ८६५ जणांना अटक केली.

मुंबई : लाचखोर अधिकाऱ्यांना आळा बसावा यासाठी यावर्षी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) अधिक कडक कारवाई करत अवघ्या सहा महिन्यात तब्बल ८६५ जणांना अटक केली. अटक आरोपींमध्ये महसूल विभाग आणि गृहविभागातील अधिकारी सर्वाधिक आहेत, तर शासकीय आस्थापनांमधील तिसऱ्या श्रेणीत काम करणारे अधिकारी-कर्मचारी सर्वात लाचखोर आहेत, हे स्पष्ट झाले.गेल्या वर्षी एसीबीने संपूर्ण राज्यात १२४५ कारवाया केल्या होत्या. जानेवारी ते जूनपर्यंत करण्यात आलेल्या कारवायांमध्ये ३७ जणांवर गुन्हा सिद्ध झाला होता. या वर्षी एसीबीने राज्यात ६१२ सापळे रचले. यामध्ये एकून ८६५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४६ सापळे जास्त आहेत. यंदा पहिल्या सहा महिन्यांमध्ये तब्बल ६१ खटल्यांमध्ये लाचखोर अधिकाऱ्यांना शिक्षा झाली. अद्यापही राज्याच्या विविध न्यायालयांमध्ये ३५८७ खटले सुरू आहेत.या आरोपींकडून १ कोटी ४२ लाख २७ हजार ४६३ इतकी मालमत्ता हस्तगत केली आहे, तर बेहिशोबी मालमत्तेपकरणी ९ कोटी ७६ लाख ५१ हजार ३९५ इतकी रक्कम हस्तगत केली आहे. लाच घेताना अटक झालेल्यांमध्ये ग्रामविकास विभाग १११, नगर विकास विभाग ४२, म.रा.वि.वि.क. मर्या ३५, आरोग्य विभाग २३, शिक्षण विभाग ३०, वन विभाग २२, सहकार आणि पणन विभाग ११ आणि पाटबंधारे विभाग ७ या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आरोपी : १५५ पोलीस, ८२ तलाठी, ३० इंजिनिअर, २२ शिक्षक, ११ डॉक्टर, ४ वकील, ५ सरपंच, २ नगरसेवक/महापौर असे लोकसेवक, तर कारवाई झालेल्या खासगी व्यक्तींची संख्या १३३ आहे. लाचखोर लोकसेवकांमध्ये ५० महिलांचा सहभाग आहे.