शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

राज्यातील विद्यार्थ्यांना ८५% जागा

By admin | Updated: September 20, 2016 04:55 IST

राज्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय व दंत वैद्यकीय महाविद्यालयांत प्राधान्य मिळावे, यासाठी राज्य सरकारने घेतलेला अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल) बंधनकारक करण्याच्या निर्णय योग्य

मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय व दंत वैद्यकीय महाविद्यालयांत प्राधान्य मिळावे, यासाठी राज्य सरकारने घेतलेला अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल) बंधनकारक करण्याच्या निर्णय योग्य आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे आता स्थानिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय व दंत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्राधान्याने प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या ८५ टक्के जागा केवळ राज्यातील विद्यार्थ्यांमधूनच भरण्यासंदर्भात राज्य सरकारने कायदा केला आहे. राज्यातून दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या आणि अधिवासाचे प्रमाणपत्र असणाऱ्याच विद्यार्थ्यांना राज्याच्या ८५ टक्के कोट्यातून प्रवेश देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांचे प्रवेशही केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारेच करण्याचा निर्णय सरकारने घेतला. राज्य सरकारच्या या दोन्ही निर्णयांना परराज्यांतील विद्यार्थ्यांनी, खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी व अल्पसंख्याक महाविद्यालयांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकांवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. एम.एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती. ‘अधिवासाचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर स्थगिती देण्यास आम्ही नकार देत आहोत. सरकारच्या या निर्णयामध्ये आम्ही या घडीला हस्तक्षेप करू इच्छित नाही,’ असे खंडपीठाने म्हटले.खंडपीठाच्या या निर्णयामुळे यंदाची वैद्यकीय व दंत वैद्यकीय महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सरकारच्या नव्या धोरणानुसार होईल. खासगी विनाअनुदानित व अल्पसंख्याक महाविद्यालयांना ८५ टक्के जागा स्थानिक विद्यार्थ्यांना द्याव्या लागतील, तर १५ टक्के जागा व्यवस्थापन कोट्यातून देता येतील.राज्य सरकारने या धोरणाबाबत स्पष्टीकरण देताना खंडपीठाला सांगितले होते की, हा राज्यातील विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय असून यामुळे खासगी विनाअनुदानित व अल्पसंख्याक महाविद्यालयांचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही. खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांतर्फे अ‍ॅड. पी. थोरात यांनी सरकारचे हे धोरण मनमानी असल्याचे खंडपीठाला सांगितले. ‘खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांना सरकारकडून अनुदान मिळत नाही. त्यामुळे सरकारचे नियम या महाविद्यालयांना लागू होऊ शकत नाहीत,’ असा युक्तिवाद अ‍ॅड. थोरात यांनी केला होता. मात्र उच्च न्यायालयाने सरकारचा युक्तिवाद ग्राह्य धरत याचिकाकर्त्यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार देत या याचिकांवर अंतरिम सुनावणी ठेवली आहे. (प्रतिनिधी) >विद्यार्थ्यांच्या हितासाठी राज्य सरकारने या धोरणाबाबत स्पष्टीकरण देताना खंडपीठाला सांगितले होते की, राज्यातील विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय असून यामुळे खासगी विनाअनुदानित व अल्पसंख्याक महाविद्यालयांचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही.‘राज्यात डॉक्टरांची कमतरता असल्याने परप्रांतीय येथेच स्थायिक होण्याची शक्यता आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना परराज्यात सहज प्रवेश मिळत नाही. त्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे,’ असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील अणे यांनी केला.