शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचा ८५ लाख प्रवाशांना लाभ

By admin | Updated: January 8, 2016 02:14 IST

एसटी बसमधून प्रवास करण्याकरिता समाजातील विविध घटकांना प्रवास भाड्यात सवलत देण्याची योजना राज्य परिवहन मंडळाची आहे.

जयंत धुळप,  अलिबागएसटी बसमधून प्रवास करण्याकरिता समाजातील विविध घटकांना प्रवास भाड्यात सवलत देण्याची योजना राज्य परिवहन मंडळाची आहे. २०१५ मध्ये एसटीच्या पेण-रामवाडी येथील रायगड विभागांतर्गत कार्यरत सर्व एसटी आगारांच्या माध्यमातून जिल्ह्यातील तब्बल ८५ लाख प्रवाशांनी या प्रवास भाडे सवलतीचा लाभ घेतला असल्याची माहिती एसटीच्या रायगड विभागाचे विभागीय नियंत्रक अजित गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.प्रवाशांच्या सेवेसाठी या आपल्या ब्रीद वाक्यास जागून, राज्याच्या खेड्यापाड्यात पोहोचणारी राज्य परिवहन मंडळाची ‘एसटी’ बस म्हणजे राज्यातील कोट्यवधी प्रवाशांची एक अत्यावश्यक सेवा आहे. ८५ लाख प्रवाशांमध्ये सर्वाधिक असे ४७ लाख १० हजार ३९२ लाभार्थी प्रवासी हे ज्येष्ठ नागरिक आहेत. समाजातील ज्येष्ठ नागरिकांना अनेकदा प्रवास करावा लागतो. त्यांचे आर्थिक उत्पन्न विचारात घेता त्यांच्यासाठी भाडे सवलत देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने गेल्या अनेक वर्षांपूर्वी घेतला आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास भाड्यामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येते.राज्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपली शाळा, महाविद्यालयात पोहोचून शिक्षण घेण्याकरिता दररोज एसटी हेच एकमेव प्रवासाचे साधन आहे.ग्रामीण भागातील पालकांच्या आर्थिक उत्पन्नाचा विचार करता या पालकांनाआपल्या पाल्यांचा एसटीच्या प्रवासाचा दररोजचा प्रवास तिकीट खर्च भागवणे अनेकदा अशक्य होत असते. परिणामी विद्यार्थ्यांवर शालेय वा महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ येते आणि ते शिक्षणापासून वंचित राहतात. ही समस्या महामंडळाने गांभीर्याने विचारात घेवून विद्यार्थ्यांकरिता एसटी प्रवास भाड्यात ६६.६६ टक्के सवलत दिली आहे. या सवलतीचा २०१५ मध्ये जिल्ह्यातील ३० लाख ६८ हजार ४११ विद्यार्थ्यांनी लाभ घेवून आपल्या आयुष्यातील शिक्षणाचा पुढील टप्पा गाठला आहे. विद्यार्थ्यांकरिता केवळ तिकिटात सवलतच नव्हे तर शाळा व महाविद्यालयांच्या वेळेप्रमाणे एसटीच्या फेऱ्यांचे नियोजन गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येते. परिणामी गावातून शाळा-कॉलेजला जाणाऱ्या व येणाऱ्या एसटी बसचे ‘कॉलेजची एसटी’ असे नामकरण देखील अनेक ठिकाणी झाले आहे.अंध आणि अपंग समाज घटकांकरिता एसटीची गेल्या अनेक वर्षांपासून भाडे सवलत योजना आहे. या योजनेअंतर्गत अंध व अपंग प्रवाशांना प्रवास भाड्यात ७५ टक्के सवलत देण्यात येते. सन २०१५ मध्ये रायगड जिल्ह्यात ७ लाख १७ हजार ४०१ अंध व अपंग प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या व्यतिरिक्त एसटीच्या मासिक सवलत पास योजना, विशिष्ट कालावधीकरिता सवलत योजना अशा योजना असून या योजनांचा जिल्ह्यात सुमारे दोन लाख प्रवाशांनी लाभ घेतला आहे.