शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाढता वाढता वाढे; ‘समृद्धी’वरील वाहतूक; दरमहा तब्बल ६ लाख ७६ हजार वाहने धावतात सुसाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 08:09 IST

२०२२ मध्ये नागपूर ते शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर गेल्या वर्षी इगतपुरीपर्यंतचा प्रवास सुरू झाला. 

मुंबई : नागपूर ते मुंबई या दोन शहरांमधील अंतर कमी करणाऱ्या समृद्धी महामार्गाने वेगवान वाहतुकीचे नवे विक्रम स्थापित केले आहेत. उद्घाटनानंतर गेल्या १६ महिन्यांत या महामार्गावरून ८२ लाख वाहनांनी प्रवास केला असून दरमहा ६ लाख ७६ हजार वाहने (दररोज सरासरी २० ते २५ हजार) या महामार्गावरून धावत आहेत. त्यातून या प्रकल्पाची कार्यान्वयन यंत्रणा असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) तिजोरीत ६३१ कोटींचा महसूल जमा झाला आहे.

नागपूर-मुंबई या ७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाचा ६२५ किमी लांबीचा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते डिसेंबर, २०२२ मध्ये नागपूर ते शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर गेल्या वर्षी इगतपुरीपर्यंतचा प्रवास सुरू झाला. 

वाढत्या वाहतुकीचा चढता आलेखडिसेंबर, २०२२ मध्ये उद्घाटनानंतर दरमहा २ लाख २० हजार वाहनांनी या शीघ्रसंचार द्रुतगती मार्गाचा लाभ घेतला. त्यातून सरकारच्या तिजोरीत १३ कोटी १७ लाख रुपयांचा महसूल जमा झाला होता. ऑगस्ट, २०२३ मध्ये दरमहा ५ लाख वाहनांनी या महामार्गावरुन प्रवास केला. डिसेंबर २०२३ मध्ये पहिल्यांदा या मार्गावरून वाहनांनी ७ लाखांचा टप्पा ओलांडत एकूण ७ लाख ४० हजार वाहनांनी प्रवास केला.मार्च, २०२४ मध्ये दरमहा सुमारे ६ लाख ७६ हजार वाहनांनी प्रवास केला. यातून ‘एमएसआरडीसी’च्या तिजोरीत ५४ कोटी ३८ लाख रुपयांचा महसूल जमा झाला.

मुंबई जोडणीनंतर...सद्य:स्थितीत या महामार्गाची मुंबईला जोडणी नसल्याने अपेक्षित प्रवासी वाहतुकीत वाढ झाली नाही. मात्र, मुंबईशी जोडणी मिळाल्यानंतर वाहतुकीत वाढ होईल, असा यंत्रणांचा दावा आहे. तसेच मुंबई आणि नागपूर हे प्रवासाचे अंतर जवळ आल्याने शेतमालाची वाहतूक वाढेल, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गालगतच्या परिसरात उद्योगधंद्यांच्या वाढीला चालना मिळण्यासाठी आणखी काही वर्षांचा कालावधी जाणार आहे. त्यानंतर वाहनांच्या संख्येत आणखी वाढ होईल, असे ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग