शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

जिल्ह्यात ८ हजार दहीहंड्या

By admin | Updated: August 23, 2016 03:01 IST

गोपाळकाल्याच्या दिवशी २ हजार ३७० सार्वजनिक तर ५ हजार ८०१ खाजगी अशा एकूण ८ हजार १७१ दहीहंड्या गोविंदा फोडणार

जयंत धुळप,

अलिबाग- रायगड जिल्ह्यात गुरु वारी २४ आॅगस्ट रोजी गोपाळकाल्याच्या दिवशी २ हजार ३७० सार्वजनिक तर ५ हजार ८०१ खाजगी अशा एकूण ८ हजार १७१ दहीहंड्या गोविंदा फोडणार असून त्यातील सर्वाधिक २६० सार्वजनिक दहीहंड्या तळा येथे तर सर्वाधिक ९०० खाजगी दहीहंड्या दिघीमध्ये आहेत. या दिवशी एकूण ५४ गोविंदा पथकांच्या मिरवणूक जिल्ह्यात असून त्यातील सर्वाधिक आठ मिरवणूक गोरेगाव येथे आहेत. पोलादपूर शहरात २५ आॅगस्ट रोजी गुजर समाजाच्या सार्वजनिक पाच तर खाजगी सात अशा १२, महाडमध्ये गुजर समाजाची एक आणि गोरेगावमध्ये गुजराती समाजाची एक अशा एकूण १४ दहीहंड्या वैशिष्टपूर्ण परंपरेनुसार फोडण्यात येणार आहेत. गोकुळाष्टमी आणि गोपाळकाल्याच्या निमित्ताने कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता जिल्ह्यात शांतता समित्याच्या बैठका घेण्यात आल्या आहेत तर या दिवशी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक यांनी दिली आहे.>पोलीस कार्यक्षेत्रातील दहीहंड्या व मिरवणुकाकर्जत सार्वजनिक १५, खाजगी ९० दहीहंड्या आणि १ मिरवणूक, नेरळ ६५ सार्वजनिक, १५५ खाजगी, २ मिरवणुका , माथेरान ७ सार्वजनिक, खालापूर ११ सार्वजनिक, १९० खाजगी, खोपोली ६० सार्वजनिक, ५५ खाजगी, मिरवणुका २, रसायनी १०५ सार्वजनिक, १४० खाजगी, पेण १११ सार्वजनिक , २७० खाजगी, ४ मिरवणुका, दादर(पेण) सार्वजनिक ४५, खाजगी १५०, पोयनाड सार्वजनिक ९४, खाजगी ६४, मिरवणुका ३. वडखळ १३५सार्वजनिक, १५० खाजगी, अलिबागसार्वजनिक १०५, खाजगी ३६०, मिरवणुका २, रेवदंडा १३० सार्वजनिक, २५६ खाजगी, ३ मिरवणुका, मुरुड १४२ सार्वजनिक, १९१ खाजगी, ३ मिरवणुका, मांडवा सार्वजनिक ७५, खाजगी १७०, मिरवणूक १, रोहा सार्वजनिक १६८, खाजगी ७३, मिरवणूक ७, कोलाड सार्वजनिक ६९, खाजगी ५८, मिरवणूक १, नागोठणे सार्वजनिक ५२,खाजगी २३५, पाली सार्वजनिक ११७, खाजगी ४८, मिरवणूक ३, माणगांव सार्वजनिक १७, खाजगी ३१२, मिरवणूक ६, गोरेगांव सार्वजनिक २६, खाजगी ९२, मिरवणूक ८, तळा सार्वजनिक २६०, खाजगी२२, मिरवणूक ४, श्रीवर्धन सार्वजनिक ६८, खाजगी ८७३, म्हसळा सार्वजनिक ८९, खाजगी ५३५, दिघी सार्वजनिक ३५, खाजगी ९००, मिरवणूक ३, महाड शहर सार्वजनिक ६५, खाजगी१४४, मिरवणूक १, महाड तालुका सार्वजनिक १०५ खाजगी ११३, बिरवाडी सार्वजनिक ८६, खाजगी ७०, पोलादपूर सार्वजनिक ११३, खाजगी १३८, एकूण सार्वजनिक २,३७०, खाजगी ५,८०१ मिरवणुका ५४