शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

हक्कभंग नोटीस घेऊन सुषमा अंधारेंच्या घरी पोहोचले ८ पोलिस; आमदार अनिल परब संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 08:46 IST

सुषमा अंधारे यांच्यावरील ‘हक्कभंग’वरून आ. अनिल परब यांचा आरोप 

मुंबई - उद्धवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना विधिमंडळाच्या हक्कभंग समितीने नोटीस पाठविली. मात्र, ती देण्यासाठी अंधारेंच्या घरी ८ पोलिस गेले, यावरून उद्धवसेनेचे आ. अनिल परब यांनी शुक्रवारी विधान परिषदेत संताप व्यक्त केला. अंधारे यांना घाबरविण्यासाठी, त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी पोलिसांचा वापर केल्याचा आरोप आ. परब यांनी केला.

प्रश्नोत्तराच्या तासानंतर आ. परब यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे या घटनेकडे सभागृहाचे लक्ष वेधले. अंधारे, कुणाल कामरा यांच्याविरोधातील हक्कभंग प्रस्ताव सभागृहात आला. तो मंजूर होऊन हक्कभंग समिती प्रमुखांकडे गेला. हक्कभंग मान्य होऊन नोटीस काढली. मात्र, पोस्टाने किंवा विधिमंडळाच्या कर्मचाऱ्यांमार्फत नोटीस न पाठवता क्राइम ब्रँचच्या ८ पोलिसांना पाठविण्यात आले. पोलिसांना काही काम उरले नाही का? कित्येक आरोपी मोकाट सुटले आहेत, त्यांना पकडायचे सोडून पोलिस नोटीस घेऊन गेले. हे काय चालले आहे, अशी टीका आ. परब यांनी केली.

नोटीस प्रोसिजरनुसारच पाठविल्याचा दावाहक्कभंग समितीचे प्रमुख आ. प्रसाद लाड उत्तर देताना म्हणाले की, समितीच्या बैठकीमध्ये नोटीस पाठवण्याचे निश्चित झाले. नोटीस पाठवल्यानंतर अंधारे यांच्या पत्त्यावर कोणी राहत नसल्याचे उत्तर आले. समितीच्या दुसऱ्या प्रोसिजरनुसार जिल्ह्यातील एसपी किंवा शहराच्या पोलिस आयुक्तांमार्फत नोटीस पोहोचविली जाते. कुणाल कामराला नोटीस पाठविली; पण त्यांचा पत्ता समितीकडे नसल्यामुळे ती नोटीसही आयुक्तांमार्फत पाठविली. त्यामुळे नोटीस प्रोसिजरनुसार पाठविली आहे तो अपमान परब विसरले का? पुळका कशासाठी?आ. परब यांना आता सुषमा अंधारे यांचा पुळका आला आहे. मात्र, त्याच अंधारेंनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अपमान केला होता. हा अपमान परब विसरले का? असा टोलाही आ. लाड यांनी लगावला.  सभापती प्रा. राम शिंदे यांनी याबाबत समितीच्या बैठकीत चर्चा होऊ शकते सभागृहात नाही, असे स्पष्ट करून हा मुद्दा निकाली काढला.  

टॅग्स :Anil Parabअनिल परबSushma Andhareसुषमा अंधारे