शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धोका वाढला! कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा महाराष्ट्रात शिरकाव; ८ जणांमध्ये आढळली लक्षणं

By कुणाल गवाणकर | Updated: January 4, 2021 19:22 IST

मुंबईतील ५, पुणे, ठाणे, मीरा-भाईंदरमधील प्रत्येकी एकाचा समावेश

मुंबई: ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेननं महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील ८ प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणं आढळून आली आहेत. त्यामुळे धोका वाढला आहे. नव्या स्ट्रेनची लक्षणं आढळून आलेल्या प्रवाशांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.ब्रिटनहून परतलेल्या ८ जणांमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं आढळून आल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपेंनी ट्विट करून दिली. 'ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील ८ प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यात मुंबईतील ५, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदरमधील प्रत्येकी एका जणाचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे,' अशी माहिती टोपेंनी दिली. गेल्या आठवड्यात देशातल्या सर्व राज्यांमध्ये कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम घेतली गेली. त्या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरणचा, वितरणाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. राज्यातील ८ जणांमध्ये नव्या स्ट्रेनची लक्षणं आढळून आल्याची माहिती याच बैठकीतून समोर आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधित महापालिकांचे आयुक्त आणि आरोग्य विभागाशी संवाद साधला आणि त्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आल्यानंतर आरोग्य विभागानं गेल्या काही दिवसांत तिथून परतलेल्यांचा शोध सुरू केला. त्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं. पैकी ८ जणांमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं आढळून आली आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. सध्याच्या घडीला भारत आणि ब्रिटन यांच्यातील विमान सेवा बंद आहे. डिसेंबरमध्ये मोदी सरकारनं हा निर्णय घेतला. ८ जानेवारीपासून दोन्ही देशातील विमान वाहतूक सुरू होईल. २३ जानेवारीपर्यंत दोन्ही देशांत दर आठवड्याला ३० विमानं ये-जा करतील. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस