शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम रेल्वेमार्गावरील ८ जुन्या फे-यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 06:59 IST

बई : आरामदायी प्रवासासाठी पश्चिम रेल्वेने वातानुकूलित लोकल धडाक्यात सुरू केली. मात्र ही वातानुकूलित लोकल सुरू झाल्याने रोज सर्वसाधारण लोकलच्या ८ फे-या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महेश चेमटेमुंबई : आरामदायी प्रवासासाठी पश्चिम रेल्वेने वातानुकूलित लोकल धडाक्यात सुरू केली. मात्र ही वातानुकूलित लोकल सुरू झाल्याने रोज सर्वसाधारण लोकलच्या ८ फे-या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ जानेवारीपासून या ८ फे-या रद्द झाल्यावर याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसणार आहे.पश्चिम रेल्वेवर चर्चगेट-विरार स्थानकांदरम्यान सध्या सुरू असलेल्या लोकलच्या जागेवर एसी लोकल चालवण्यात येत आहे. १२ नॉन एसी लोकल फेºयांच्या जागी वातानुकूलित फेरीचे नियोजन आधीच्या वेळापत्रकानुसार करण्यात आले आहे. परिणामी १२ वातानुकूलित लोकलच्या फेºया सुरू झाल्यावर पश्चिम रेल्वेवरील एकूण फे-यांची संख्या ही १३५५ कामय राहणार आहे. यापैकी एसी लोकलच्या ८ फेºया या चर्चगेट-विरार (अप-डाऊन) मार्गावर आहेत. ३ फे-या या चर्चगेट-बोरीवली मार्गावर धावणार आहेत. महालक्ष्मी ते बोरीवली मार्गावर एक धिमी एसी लोकल धावणार आहे,’ अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली.यानुसार सध्या धावत असलेल्या चर्चगेट-विरार स्थानकांदरम्यान पिक अव्हरमध्ये सकाळी ८.५४ला धावणारी लोकल ही एसी लोकल असेल. त्यामुळे एसीमधून प्रवास न करणाºया प्रवाशांना ९.०३ अथवा ८.३३ मिनिटांच्या लोकलवर अवलंबून राहावे लागेल. संध्याकाळच्या पिक अव्हरमध्ये परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्हे आहेत. रात्री ७.४९ मिनिटांनी एसी लोकल धावेल. याआधीची म्हणजे ७.४० मिनिटांची लोकल ही ‘महिला विशेष’ आहे. परिणामी विरारपर्यंत प्रवास करू इच्छिणाºया प्रवाशांना ७.३३ मिनिटांची जलद लोकल अथवा ७.५६ मिनिटांच्या लोकलने प्रवास करावा लागणार आहे. विरार येथून चर्चगेटसाठी प्रवास करणाºया प्रवाशांना एसी लोकलच्या आधीच्या वा नंतरच्या फेºयांप्रमाणे आपले वेळापत्रक निश्चित करावे लागणार आहे. सर्वसामान्य प्रवाशांना एसी लोकलचा रोज प्रवास करणे शक्य होणार नाही. त्यामुळे एसी लोकलच्या आधी वा नंतरच्या जलद फेºयांवरील लोकलमध्ये गर्दी वाढणार आहे.>एका लोकलमधून सुमारे ६ हजार प्रवासी प्रवास करतात. चर्चगेट-विरारच्या कमी करण्यात येणाºया लोकलच्या फेºयांमुळे जवळपास ४८ हजार प्रवाशांना फटका बसणार आहे. गाड्यांच्या फेºया वाढविण्याऐवजी सुरू असलेल्या फेºयांच्या जागी एसी लोकल फेरी चालवणे हे अयोग्य आहे.- समीर झव्हेरी, रेल्वे माहिती अधिकार कार्यकर्ता>मुंबईत ‘गारेगार’ लोकल सुरूमुंबई : बोरीवली फलाट क्रमांक ९वर सोमवारी नाताळच्या मुहुर्तावर देशातील पहिली वातानुकूलित लोकल दाखल झाली. पश्चिम रेल्वेवर सकाळी साडेदहा वाजता या लोकलला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. - सविस्तर वृत्त/२

टॅग्स :AC localएसी लोकल