पालघर : पालघरच्या स्नेहांजली रिटेल प्रायव्हेट लिमिटेड या इलेक्ट्रॉनिक्स दुकानातून ८ लाखांचा माल चोरून उत्तर प्रदेशमध्ये पळून गेलेल्या आरोपीला व त्याच्या साथीदाराला पालघर पोलिसांनी अटक केली आहे.माहीम रोड येथील स्नेहांजली स्टोअर्समध्ये पंकज तिवारी हा वॉचमन म्हणून काम करत होता. त्या वेळी काही महिन्यांपूर्वी दुकानात छोटी चोरी झाली होती. त्यामुळे मालकांनी त्याच्या पगारातून ८ हजारांची रक्कम कापून घेतली होती. त्यामुळे चिडून त्याने नोकरी सोडली होती. दरम्यान, त्याने आपल्या ओळखीवरून नीरज शेषसिंह याला वॉचमन म्हणून स्नेहांजलीमध्ये काम दिले. आरोपी पंकजने नीरज या वॉचमनच्या साहाय्याने २५ एप्रिल रोजी रात्री दुकानाचा दरवाजा तोडून मोबाइल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही आदी ७ लाख ९१ हजार ७८८ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता.या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांनी या दोन्ही आरोपींचा शोध घेऊन नीरज शेषसिंह याला ताब्यात घेतले. पंकज तिवारी हा मुद्देमाल घेऊन आपल्या मूळ गावी उत्तर प्रदेश येथे पळून गेल्यानंतर पो.नि. संजय हजारे यांनी तेथील पोलिसांशी संपर्क साधून त्याला त्याच्या मूळ गावी अटक केली आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी पालघर पोलिसांची टीम शुक्रवारी रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
आठ लाखांचा मुद्देमाल चोरणाऱ्यास अटक
By admin | Updated: April 29, 2017 02:53 IST