ऑनलाइन टीम
बीड, दि.१२ - बीड- औरंगाबाद महामार्गावर टव्हेरा व ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात ८ जण ठार झाले आहेत. बीडपासून ९ किलोमीटर अंतरावरील गेवराई रोडवर गुरूवारी सकाळी टव्हेरा गाडी ट्रकवर आदळली. या अपघातात ८ जण जागीच ठार झाले. सर्व मृत प्रवासी हे आंबेजोगाईचे रहिवासी असल्याचे समजते.