शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
4
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
5
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
6
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
7
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
8
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
9
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
10
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
11
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
12
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
13
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
14
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
15
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
16
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
17
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
18
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
19
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
20
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश

समुद्र सुरक्षेसाठी ७८ लाखांचे साहित्य

By admin | Updated: September 21, 2016 03:20 IST

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ७८ लाख रुपये किमतीचे विविध ११ प्रकारची सुरक्षा साहित्य जिल्ह्यातील २४ किनाऱ्यांवरील सुरक्षा रक्षकांना मंगळवारी जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.या वेळी जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले म्हणाल्या की, जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसंदर्भात सर्व यंत्रणांनी तसेच सागरी किनाऱ्यावर नेमलेल्या सुरक्षा रक्षकांनी जबाबदारीने काम करावे. आपण जशी घराची स्वच्छता व देखभाल आपले घर आहे म्हणून करतो त्याचप्रकारे आपल्या भागातील सागरी किनारा, आपले शहर, आपले गाव, आपला जिल्हा हे आपले घर आहे असे समजूनच त्याकडे लक्ष द्यावे, स्वच्छता राखावी. पर्यटकाला या ठिकाणी वारंवार यावे असे वाटावे, त्यामुळे पर्यटकांत वाढ होईल. पर्यायाने येथील पर्यटन व्यवसाय चांगला वाढेल, याकडेही संबंधितांनी लक्ष द्यावे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत पर्यटकांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी करावयाच्या उपायोजनेसंदर्भात जिल्हास्तरावर कार्यक्रम राबविण्यात आला असून यात प्राथम्याने जीवरक्षकांची नेमणूक, त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील समुद्र किनारा बिचवर २५ जीवरक्षक नेमण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा परिषद रायगड उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुलकर्णी, तहसीलदार अलिबाग प्रकाश संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आदी मान्यवर उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)>आधुनिक साहित्यप्राधिकरणामार्फत जीवरक्षकांना मेगा फोन, दुर्बिण, टॉर्च, दोरखंड, लाइफ जॅकेट, फायबर स्ट्रेचर, स्कुबा ड्रायविंग सेट, जीवरक्षक रिंग, सायरन, उलन ब्लँकेट, सर्च लाइट या साहित्याचे वाटप अलिबाग, मांडवा, आक्षी, नागाव, किहिम, रेवदंडा, कोर्ले, मुरु ड-एकदरा, मुरु ड-जंजिरा जलदुर्ग, काशिद, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर, सासवणे, आवास,थळ, वरसोली, रांजणपाडा डावली, मिळकतखार, कोप्रोली बोडणी, आदगाव,वेळास आगर,घारापुरी, नागाव, पिरवाडा आदि ठिकाणांच्या सुरक्षेसाठी करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी या कार्यक्रमात दिली.24 किनाऱ्यांवरील सुरक्षा रक्षकांकडे मंगळवारी रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांच्या हस्ते सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले. 11विविध प्रकारच्या साहित्यामध्ये जीवरक्षकांना मेगा फोन, दुर्बिण, टॉर्च, दोरखंड, लाइफ जॅकेट, फायबर स्ट्रेचर, स्कुबा ड्रायविंग सेट, जीवरक्षक रिंग, सायरन, उलन ब्लँकेट, सर्च लाइटचा समावेश आहे.