पुणो : नरबळींसह आठ हत्या.. अलौकिक शक्ती असल्याचे सांगून अघोरी उपचार.. पैशांचा पाऊस.. गुप्तधनाचा शोध.. नग्नपुजा.. काळी जादू अशा प्रकारचे तब्बल 77 गंभीर गुन्हे राज्यात गेल्या वर्षभरात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत दाखल झाले आहेत.
जादूटोणाविरोधी कायदा व्हावा याकरिता महाराष्ट्र अंधo्रद्धा निमरूलन समितीच्या (अंनिस) माध्यमातून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सलग 18 वष्रे संघर्ष केला. गतवर्षी 2क् ऑगस्ट रोजी गोळ्या झाडून त्यांचा खून करण्यात आला. त्यानंतर राज्य शासनाने वटहुकूम काढून जादूटोणाविरोधी कायदा लागू केला.
नांदेड जिल्ह्यात या कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल झाला. त्यात अलौकिक शक्ती असल्याचा दावा करून असाध्य आजारावर उपचार करणा:या भोंदूबाबाला अटक करण्यात आली. सर्वात जास्त 9 गुन्हे नाशिक जिल्ह्यात दाखल झाले आहेत, त्यापाठोपाठ अकोला, बीड, सांगली यासह पुणो, मुंबई या महानगरांतही गुन्हे दाखल होऊ लागले.
नाशिकमध्ये पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली एक महिला व तिच्या मुलीचे पुजा:याने लैंगिक शोषण केले. भूतबाधा झाली असल्याचे सांगून अघोरी कृत्य करणा:या एका मांत्रिकाविरूध्द गडचिरोली जिल्ह्यात गुन्हा दाखल झाला. गर्भवती महिलेच्या स्त्रीगर्भाचे पुरूष गर्भात रूपांतर करण्याचा चमत्कार करण्याचा दावा करणा:या एका वैद्याला कोल्हापूरमध्ये बेडय़ा ठोकण्यात आल्या. सांगोला तालुक्यामध्ये सदाशिव सरगर या तरूणाचा नरबळी देण्याचा प्रकार घडला. एका टीव्ही मालिकेतील नायिकेला आध्यात्मिक शक्तीव्दारे घर मिळवून देण्याचा बहाणा करणा:या बंगाली बाबाविरुध्द मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे एक महिला बहिष्कृत करण्यात आले होते. याप्रकरणात सहभागी असणा:या मांत्रिकाविरूध्द गुन्हा दाखल झाला.
पुण्यामध्ये जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत 5 गुन्हे दाखल झाले आहेत. पैशाचा पाऊस पाडण्यासाठी महिलेला नग्नपूजा करण्यास लावणा:या एका भोंदूस विo्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. अलौकिक शक्तीचा दावा करून एका युवतीवर बलात्कार करणा:याविरूद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
पाठपुराव्यासाठी कार्यकत्र्याना प्रशिक्षण
जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल झाल्यानंतर न्यायालयात त्याचा पाठपुरावा करून दोषींना शिक्षा व्हावी याकरिता अंनिसच्या कार्यकत्र्याना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी दिली.