शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

नक्षल्यांनी जाळले ७६ ट्रक!

By admin | Updated: December 24, 2016 04:33 IST

एटापल्ली तालुका मुख्यालयापासून १८ किमी अंतरावर असलेल्या सुरजागड पहाडी परिसरात शुक्रवारी दुपारी नक्षलवाद्यांनी ७६ ट्रक,

रवी रामगुंडेवार/प्रतिक मुधोळकर / एटापल्ली (गडचिरोली) एटापल्ली तालुका मुख्यालयापासून १८ किमी अंतरावर असलेल्या सुरजागड पहाडी परिसरात शुक्रवारी दुपारी नक्षलवाद्यांनी ७६ ट्रक, तीन पोकलँड व एक दुचाकी जाळल्याची घटना घडली. तसेच ट्रकचालक व मजुरांना नक्षलवाद्यांनी मारहाणही केली आहे. मागील सहा ते आठ महिन्यांपासून सुरजागड लोहपहाडीवरून दररोज शेकडो ट्रक, लोहखनिजाच्या कच्च्या मालाची वाहतूक करीत आहेत. हा कच्चा माल लॉयड्स मेटल कंपनी घुग्गुस जिल्हा चंद्रपूर येथे नेण्यात येत होता. शुक्रवारी सकाळी ११.३०च्या सुमारास सशस्त्र नक्षलवादी सुरजागड येथे आले व त्यांनी उभ्या असलेल्या ट्रकचे डिझेल टँक फोडून ट्रक पेटवून दिले. जवळजवळ चार किमी परिसरात ७६ ट्रक, तीन पोकलँड मशीन व एक दुचाकी नक्षलवाद्यांनी जाळली.ट्रकचे टायर फुटण्याचा मोठा आवाज व धूराचे लोळ नजीकच्या हेडरी गावापर्यंत दिसत होते. हा संपूर्ण परिसर धुराने व्यापलेला होता. पेटविलेल्या पहिल्या ट्रकपासून जवळपास तीन किमी अंतरावर नक्षलवाद्यांनी मोठे झाड कापून आडवे टाकले होते.सुरजागड पहाडीवर ३ जानेवारीपासून ठाकूरदेव दसरा महोत्सव सुरू होणार आहे. अगदी त्याच्या सुरूवातीलाच नक्षलवाद्यांनी हे अग्निकांड घडवून आणले. गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात आतापर्यंतची एवढे वाहन जळाल्याची ही सर्वात मोठी घटना आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्येही दहशत पसरली आहे.