शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
2
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
3
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
4
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
5
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
6
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
7
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
8
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
9
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
10
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
11
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
12
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
13
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
14
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
15
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
17
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
18
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
19
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
20
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष

आरटीओत ७३.७६ लाखांचा अपहार

By admin | Updated: January 13, 2015 05:06 IST

मोटार वाहन कर, दंड, व्यवसाय करापोटी जमा होणारी रक्कम लेखाकोषागारात न भरता तब्बल दोन वर्षे वापरली गेली. ही बाब महालेखापालांनी उघडकीस आणल्यानंतर

अतुल कुलकर्णी, मुंबईमोटार वाहन कर, दंड, व्यवसाय करापोटी जमा होणारी रक्कम लेखाकोषागारात न भरता तब्बल दोन वर्षे वापरली गेली. ही बाब महालेखापालांनी उघडकीस आणल्यानंतर एका फटक्यात ७३.७६ लाख रुपये तातडीने भरून टाकले गेले. विशेष म्हणजे हे प्रकरण त्यानंतरही दोन वर्षे दडपण्यात आले; मात्र मुंबईतून सूत्रे हलली आणि बारामती पोलीस ठाण्यात चार अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरटीओ कार्यालयातील या गोरखधंद्याचा पर्दाफाश यानिमित्ताने उघडकीस आला असला, तरी यामागचे खरे गुन्हेगार मोकाट असल्याचे बोलले जात आहे.बारामती तालुका पोलीस ठाण्यात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमर आनंदराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीमुळे हे प्रकरण उघडकीस आले असले, तरी अर्धवट स्वरूपाची फिर्याद हा देखील बचावाचा भाग असल्याचे वरिष्ठांचे मत आहे. २०१० ते २०१२ या कालावधीत वाहन व इतर व्यवसाय कराचा ७३.७६ लाख रुपयांचा बारामतीच्या उपकोषागार कार्यालयाने ताळमेळ घेतला नसल्याचा आक्षेप मुंबईच्या महालेखापाल व पुण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नोंदवला होता. ही रक्कम लेख्याबाहेर होती व ती भरण्याची जबाबदारी ज्यांची होती त्यांनी ती पार पाडली नाही. त्यांनी या रकमेचा अपहार केला असे फिर्यादीत म्हटले असून, या प्रकरणी पुण्याचे कनिष्ठ लेखापरीक्षक भांगे, तापकीर, वरिष्ठ लिपिक गोगावले व खुळे यांच्याविरुद्ध फिर्याद देण्यात आली आहे. त्यातही बनाव असा, की या चारही अधिकाऱ्यांची पूर्ण नावेदेखील फिर्यादीत दिलेली नाहीत.विशेष म्हणजे मुंबईच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने यासंबंधी ७ जानेवारी रोजी पत्र पाठवले़ त्यानुसार ही फिर्याद देण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे. सोबत त्या पत्राची प्रतही जोडली आहे. याचा अर्थ जर असे कळवले गेले नसते, तर हे प्रकरण उघडकीस आलेच नसते. या प्रकरणी भादंवि ४०९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१२ साली घडलेले प्रकरण जेव्हा उघडकीस आले, त्याचवेळी गुन्हा दाखल का केला गेला नाही, चलन आणि ताळमेळ तपासण्याची जबाबदारी कोणाची होती, अपहार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर देखील मुंबई प्रादेशिक कार्यालयाने कळवेपर्यंत गुन्हा का दाखल केला गेला नाही आणि जर ७३.७६ लाखांची रक्कम एकाच चलनाद्वारे एकरकमी भरली गेली असेल तर एवढी मोठी रक्कम एकाच दिवशी कोणाच्या सहीने भरली गेली, असे एक ना अनेक प्रश्न अजुनही अनुत्तरितच आहेत.