शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

७२ तृतीयपंथी बजावणार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2017 21:00 IST

तीन वर्षांत वाढले २२ मतदार सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पहिल्यांदाच तृतीयपंथीयांना ‘इतर मतदार’

धनंजय वाखारे /आॅनलाइन लोकमत नाशिक :  सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पहिल्यांदाच तृतीयपंथीयांना ‘इतर मतदार’ म्हणून स्वत:ची ओळख जपण्याचा अधिकार प्राप्त झाल्यानंतर आता येत्या २१ फेबु्रवारीला होणाऱ्या नाशिक महापालिका निवडणुकीसाठी ७२ तृतीयपंथी मतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गेल्या तीन वर्षांत मतदार यादीत २२ तृतीयपंथी मतदारांची भर पडली आहे. सन २०१४ पूर्वी कोणत्याही निवडणुकांमध्ये तृतीयपंथी मतदारांचा समावेश पुरुष गटातच केला जात होता. परंतु, तृतीयपंथीयांना स्त्री-पुरुष गटात न टाकता त्यांची इतर मतदार म्हणून स्वतंत्र नोंद करण्यात यावी, यासाठी तृतीयपंथीयांच्या संघटनांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा पुकारला होता. अखेर, सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी तृतीयपंथीयांचा ‘इतर मतदार’ या स्वतंत्र कॅटेगिरीत समावेश करण्यात येऊन त्यांना मतदानाचा हक्क बहाल करण्यात आला. महाराष्ट्रात सुमारे ४१ हजारांहून अधिक तृतीयपंथी असल्याचे सांगितले जाते. त्यातील ९८४ तृतीयपंथीयांनीच मतदार यादीत नाव नोंदवले होते. सन २०१४ मध्ये झालेल्या नाशिक लोकसभा निवडणुकीत ५० तृतीयपंथी मतदार होते. परंतु इगतपुरीतील केवळ दोनच तृतीयपंथीयांनी मतदान केल्याची नोंद झाली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही ५० मतदार होते. आता महापालिका निवडणुकीसाठी तृतीयपंथी पहिल्यांदाच मतदान करणार असून, शहरात ७२ तृतीयपंथी मतदार आहेत. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत तृतीयपंथीय मतदारांच्या संख्येत २२ ने भर पडली आहे. विशेष म्हणजे राज्यात मुंबई महापालिका निवडणुकीत एक तृतीयपंथी उमेदवारही नशीब आजमावत आहे. इन्फो गुरूच्या शिफारशीने नोंदणी तृतीयपंथीयांकडून वयाचा अथवा निवासाचा दाखला उपलब्ध होणे अवघड असते. त्यामुळे मतदार यादीत कशाप्रकारे नोंद करायची, याबाबत संभ्रम होता. परंतु, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, त्यांच्या गुरूने शिफारस केल्यानंतरच मतदार यादीत त्यांची नोंद करण्यात येऊ लागली आहे. मतदार नोंदणीच्या शपथपत्रात गुरू आणि चेला असे दोन रकाने ठेवलेले असतात. त्यात पालकाच्या नावाऐवजी गुरूचे नाव लिहायचे आणि गुरूने शिफारस केल्यानंतर त्यांची नोंद केली जाते. त्यामुळे मतदानाच्या हक्काबाबत आता तृतीयपंथीही जागरूक झाले आहेत.