शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

७/११ बॉम्बस्फोटांचा आज होणार फैसला

By admin | Updated: September 11, 2015 03:23 IST

मुंबईसह देशाला हादरवणाऱ्या ७/११ रेल्वे साखळी बॉम्बस्फोटांचा फैसला विशेष सत्र न्यायालय शुक्रवारी जाहीर करणार आहे. या बॉम्बस्फोटात १८८ जणांचा बळी गेला होता तर ८२९ जण जखमी झाले होते.

मुंबई: मुंबईसह देशाला हादरवणाऱ्या ७/११ रेल्वे साखळी बॉम्बस्फोटांचा फैसला विशेष सत्र न्यायालय शुक्रवारी जाहीर करणार आहे. या बॉम्बस्फोटात १८८ जणांचा बळी गेला होता तर ८२९ जण जखमी झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी तेरा जणांना अटक केली आहे. नऊ वर्षांनंतर याचा निकाल जाहीर होणार असल्याने या आरोपींना न्यायालय काय शिक्षा ठोठावणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. उपनगरीय पश्चिम रेल्वे गाड्यांच्या फर्स्ट क्लास डब्यात ११ जुलै २००६ रोजी बॉम्बस्फोट झाले होते. हे बॉम्बस्फोट खाररोड-सांताक्रुझ, वांद्रे-खाररोड, जोगेश्वरी-माहिम, मीरारोड-भार्इंदर, माटुंगा-माहिम व बोरीवली येथे झाले होते. याप्रकरणी अतिरेकीविरोधी पथकाने कमाल अहमद अन्सारी, डॉ. तन्वीर अन्सारी, मोहम्मद शेख, सिद्दीकी, मोहम्मद शफी,शेख आलम शेख, मोहम्मद अन्सारी, अब्दुल शेख, मुझमिल शेख, सोहिल शेख, जमीर शेख, नावेद खान व असिफ खान या आरोपींना अटक केली.या आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले व याचा खटलाही सुरू झाला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने २००८ मध्ये या खटल्याला स्थगिती दिली. २०१० मध्ये ही स्थगिती न्यायालयाने उठवली. त्यानंतर विशेष न्यायाधीश यतिन शिंदे यांच्यासमोर याचा खटला सुरू झाला. या खटल्यात आयपीएस व आयएएस अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवण्यात आली. तसेच जवळपास साडेपाच हजार पानांचा पुरावा न्यायालयात सादर झाला. गेल्यावर्षी आॅगस्ट महिन्यात याची सुनावणी पूर्ण झाली. (प्रतिनिधी)