शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

मुंबईतील ७/११ बॉम्बस्फोट: १२ जण दोषी, १ निर्दोष

By admin | Updated: September 11, 2015 17:37 IST

मुंबईतील ७/११ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई विशेष सत्र न्यायालयाने १२ आरोपींना दोषी ठरवले असून एकाची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ११ - मुंबईतील ११ जुलै २००६ किंवा ७/११ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई विशेष सत्र न्यायालयाने  १२ आरोपींना दोषी ठरवले असून एका आरोपीची निर्दोष सुटका केली आहे. नऊ वर्षांपूर्वी झालेल्या या स्फोटांत १८८ नागरिकांनी आपला जीव गमावला होता तर तब्बल ८२९ जण जखमी झाले होते.

न्यायालयाने कमाल अहमद अन्सारी(३७), डॉ. तन्वीर अन्सारी (३७), मोहम्मद फैसल शेख (३६), सिद्दीकी (३०), मोहम्मद शफी (३२),शेख आलम शेख (४१), मोहम्मद अन्सारी (३४),  मुझमिल शेख (२७), सोहिल शेख (४३), जमीर शेख (३६), नावेद खान (३०) व असिफ खान (३८) या १२ आरोपींना दोषी ठरवले असून अब्दुल शेख याची सर्व आरोपातून निर्दोष सुटका करण्यात आली आहे. या १२ दोषींच्या शिक्षेवर सोमवारी युक्तिवाद होणार आहे. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालय प्रत्येक गुन्हेगाराला किती शिक्षा द्यायची हे जाहीर करणार आहे. या खटल्यादरम्यान सरकारतर्फे १९२ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या, बचाव पक्षातर्फे ५१ साक्षीदार हजर करण्यात आले तर न्यायालयातर्फे एका साक्षीदाराची साक्षी नोंदवण्यात आली. 

११ जुलै २००६ मध्ये पश्चिम रेल्वेच्या खार, वांद्रे, जोगेश्वरी, माहिम, मीरारोड, माटुंगा व बोरीवली या स्थानकांवरील लोकलमध्ये ११ मिनीटात सात बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटात १८८ जणांचा बळी गेला होता तर ८२९ जण जखमी झाले होते. या साखळी स्फोटांनी मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवले होते. या प्रकरणात दहशतवादविरोधी पथकाने १३ जणांना अटक केली होती. नऊ वर्षानंतर या प्रकरणी विशेष सत्र न्यायालयाने शुक्रवारी निकाल दिला आहे. कोर्टाने १२ आरोपींना दोषी ठरवले. हत्या, देशाविरोधात कट रचणे आदी कलमांखाली या आरोपींना दोषी ठरवण्यात आले. 

न्यायालयाच्या निर्णयामुळे या स्फोटांमध्ये मृत्यूमुखी पडलेले तसेच जखमी झालेले नागरिक व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया तत्कालिन दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख के.पी. रघुवंशी यांनी व्यक्त केली. दहशतवादविरोधी पथकाच्या तपासामध्ये आयएसआय व लष्कर-ए-तय्यबा यांनी या बाँबस्फोटांची आखणी केली होती. 

७/११ च्या मुंबईतील रेल्वे बाँबस्फोटातील ठळक वैशिष्ट्ये:

- मुंबईतील उपनगरीय गाड्यांमध्ये आरडीएक्सचे एकूण सात बाँब ठेवण्यात आले होते.

- बाँब ठेवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करण्यात आला.

- या भयानक हल्ल्यामध्ये १८० प्रवासी ठार झाले तर सुमारे ८०० जण जखमी झाले.

- जून २००७मध्ये खटल्याची सुनावणी सुरू झाली.

- कमाल अन्सारीने बंडखोरीला प्रोत्साहन देणे हा शब्दप्रयोग मोक्काच्या संदर्भात करणे घटनाबाह्य असल्याचा युक्तिवाद केला, परंतु न्यायालयाने तो फेटाळला.

- हल्ला झाला त्यावेळी आरोपी कुठे होते हे तपासण्यासाठी मोबाईल कॉल रेकॉर्डरचा उपयोग करण्याची त्यांची मागणी न्यायालयाने मान्य केली व डिसेंबर २०१२मध्ये तसा आदेश दिला, त्यावेळी चार आरोपी चर्चगेट तसेच बाँबस्फोट झालेल्या स्थानकांच्या जवळपास नसल्याचे आढळले.

- साक्षीदारांचे जबाब नोंदवलेल्या पानांची संख्या तब्बल ५५५० एवढी भरली.

- अखेर या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या आयएसआय व लष्कर-ए-तय्यबा पुरस्कृत १२ दहशतवाद्यांच्या क्रूरकृत्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब करत त्यांना दोषी ठरवले.

- सोमवारी यापैकी प्रत्येकाला शिक्षा किती द्यायची यावर सुनावणी होणार असून कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.