शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

इतर पक्षांतील ७० आमदार भाजपाच्या संपर्कात!, राणेंचा प्रवेश नवरात्रात; विरोधकांचे संख्याबळ कमी करण्याचा डाव  

By अतुल कुलकर्णी | Updated: September 12, 2017 05:23 IST

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधील तब्बल ७० आमदार भाजपाच्या संपर्कात असून कोणाला घ्यायचे आणि कोणाला नाही याचा निर्णय भाजपा पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा भाजपाप्रवेश नवरात्रात केला जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालीे आहे.

मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधील तब्बल ७० आमदार भाजपाच्या संपर्कात असून कोणाला घ्यायचे आणि कोणाला नाही याचा निर्णय भाजपा पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा भाजपाप्रवेश नवरात्रात केला जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालीे आहे.काँग्रेस पक्षावर नाराज असलेले राणे सध्या भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यामुळेच त्यांनी पक्षाचे राष्टÑीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मराठवाडा दौºयाकडे पाठ फिरवली. राणेंना पक्षात घेण्यावरून भाजपात बराच खल झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणे यांच्या भाजपात येण्याचे फायदे पटवून दिल्याने त्यांची वाट सुकर झाल्याचे समजते. राणेंच्या रूपाने मराठा समाजाचा एक मोठा नेता भाजपात येईल. शिवाय, कोकणात काँग्रेस व शिवसेनेला खिंडार पाडता येईल, असे राजकीय गणित मांडले जात आहे.राणेंच्या सोबत नितेश राणे आणि कालिदास कोळंबकर भाजपात आले तर आपोआप काँगे्रेसचे संख्याबळ कमी होऊन विरोधी पक्षनेतेपद राष्टÑवादीकडे जाऊ शकते, असा डावही यामागे आहे.राष्टÑवादीचा माजी मंत्री ‘रांगेत’?पश्चिम महाराष्टÑातील राष्टÑवादीच्या एका दुय्यम नेत्याला भाजपात प्रवेश दिल्यानंतर त्याच जिल्ह्यातील मंत्री राहिलेल्या दुसºया बड्या नेत्याने थेट मुख्यमंत्र्यांना फोन करून, मी स्वत: तुमच्याकडे येण्यास तयार असताना तुम्ही त्याला कशाला घेत आहात, असा सवाल केल्याचे समजते.विधानसभेत भाजपाचे संख्याबळ १२२ आहे. सरकारला पूर्ण बहुमतासाठी १४५ची गरज आहे. शिवसेना सतत विरोधी भूमिका घेत आहे. त्यामुळे पूर्ण बहुमत मिळेल अशी तजवीज करायची खेळी मुख्यमंत्री खेळत आहेत.पितृपक्षानंतर जे बदल अपेक्षित आहेत, त्यात शिवसेनेमधील उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री रामदास कदम, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यापैकी दोघांना बदलण्यात येईल, अशी चर्चा आहे. सरकारमध्ये भाजपाकडून होणाºया बदलावेळीच शिवसेनेनेही बदल करावेत यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर सेना आमदारांचा दबाव वाढत आहे.

टॅग्स :BJPभाजपाNarayan Raneनारायण राणे Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस