शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

तूरखरेदी घोटाळ्यात ७० जणांवर गुन्हा दाखल, संशयितांमध्ये ११ महिलांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 02:02 IST

जालना केंद्रावरील तूर खरेदी प्रकरणी चंदनझिरा पोलिसांत ४९ शेतकरी, १८ व्यापा-यांसह ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संशयितांमध्ये ११ महिलांचा समावेश आहे.

जालना : जालना केंद्रावरील तूर खरेदी प्रकरणी चंदनझिरा पोलिसांत ४९ शेतकरी, १८ व्यापा-यांसह ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संशयितांमध्ये ११ महिलांचा समावेश आहे.जालना कृषी बाजार समिती आवारात असलेल्या नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर शेतकºयांच्या नावावर व्यापाºयांनीच तूर विक्री केल्याच्या तक्रारींची दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी तपास केला. कागदपत्रांची छाननी केल्यानंतर यात ८४०० शेतकºयांची नावे संशयास्पद असल्याचे समोर आले. हा तपास पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकाºयांनी संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शुक्रवारी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील केंद्रावर शेतकºयांच्या नावे तूर विक्री करणाºया १८ व्यापाºयांसह ४९ शेतकºयांवर चंदनिझरा पोलीस ठाण्यात कलम ४६७, ४६८, ४२०, ४०९, ३४ व जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्ह्यातील सातोना, परतूर, अंबड आणि तीर्थपुरी येथील नाफेडच्या हमीभाव तूर खरेदी केंद्रांवरील बोगस नावांवर केलेल्या तूर विक्रीचा तपास अहवाल आठ दिवसांत सादर होणार आहे़- एप्रिल व मे महिन्यात या ४९ शेतकºयांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ९२ लाख, ५७ हजार ८५९ रुपये किमतीची तूर नाफेड केंद्रावर विकली. पैकी ८४ लाख नऊ हजार ८३३ रुपये ‘आरटीजीएस’द्वारे व्यापाºयांच्या खात्यावर वर्ग केले, असे साहाय्यक निबंधक विष्णू रोडगे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा