मुंबई : पवई येथील चांदिवली लेक होम या २१ मजल्यांच्या इमारतीतील १४ व्या आणि १५ व्या मजल्याला शनिवारी सायंकाळी ५ वाजता आग लागली. या दुर्घटनेत ७ रहिवाशांचा मृत्यू झाला असून, सुमारे २५ जण जखमी झाले. त्यापैकी एका जखमीला ऐरोली येथील नॅशनल बर्न्स सेंटर येथे उपचारार्थ हलविण्यात आले असून, उर्वरीत जखमींवर हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.दुर्घटनेतील जखमींमध्ये अग्निशमन दलाचे अधिकारी पवार यांचा समावेश आहे. तर मृतांपैकी अश्विन भाटीया (५३), अमर रणजित सरकार (३०), बाबू लोहार (२५) आणि सोनी, तौशिक यांची नावे समोर आली आहेत. काळबादेवी येथील भीषण आगीत अग्निशमन दलाचे चार प्रमुख अधिकारी शहीद झाले़ या दुर्घटनेला महिना उलटण्यापूर्वीच शनिवारी चांदिवलीमधील घटना घडली. इमारतीच्या १४ व्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी दाखल झाले़ (प्रतिनिधी)लिफ्टचा वापर जीवावर बेतला१४ व्या मजल्यावरील फ्लॅट पूर्णपणे जळून खाक झाला़ वरच्या मजल्यावर पसरणारी आग विझविण्यासाठी इमारतीमधील अग्निरोधक यंत्रणेचा अग्निशमन दलास वापर करता आला़ त्यामुळे १५ ते २१ व्या मजल्यांपर्यंतच्या फ्लॅटमध्ये अडकून पडलेल्या २२ रहिवाशांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलास यश आले़ मात्र आग लागल्यानंतर खाली उतरण्यासाठी लिफ्टमध्ये शिरलेले काही रहिवासी मृत्युमुखी पडल्याचे जवानांना सापडले़आगीनंतर सुरक्षेच्या कारणास्तव इमारत रिकामी आग वरच्या मजल्यांपर्यंत पसरल्यामुळे १५ बंब, पाण्याचे टँकर्स घटनास्थळी दाखल झाले. मोठ्या शिड्यांचा वापर करुन इमारतीच्या दोन्ही बाजूने पाण्याचा मारा करण्यास जवानांनी सुरुवात केली़ मात्र यावेळी आपला बचाव करण्यासाठी लिफ्टचा वापर करणारे सात रहिवासी मृत्युमुखी पडले़ आगीच्या घटनेनंतर इमारतीचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला, त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव इमारत रिकामी केली. वृद्ध महिलेची दक्षता व पोलीसांचे बचाव कार्यचांदिवली येथील इमारतीच्या आगीकडे येथील एका वृद्ध महिलेचे लक्ष गेले. तिने तात्काळ आगीची क्लिप आपल्या मोबाईलमध्ये काढली. त्यानंतर ही वृद्ध महिला पवई पोलीस ठाण्यात दाखल झाली. आणि तिने या घटनेची माहिती पोलीसांना दिली. यावर पोलीस नाईक पेडणेकर आणि फौजदार समीर मुजावर हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परंतु तोपर्यंत आगीने रौद्र रुप धारण केले होते. असेही बचाव कार्य :दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या लगत असलेल्या दुसऱ्या इमारतीच्या गच्चीहून बचाव कार्य सुरु करण्यात आले होते. परिसरात भितीचे सावटया इमारतीत लागलेल्या आगीच्या वृत्ताने परिसरात भितीचे सावट पसरले. शेजारील इमारतील रहिवाशी सावधानता बाळगत इमारतीतून बाहेर पडले.वांद्रयातही झोपडपट्टीला आग वांद्रे येथील राहुल नगर झोपडपट्टीमध्ये शनिवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास आगीचा भडका उडाला़ या आगीत तीनजण जखमी झाले़ त्यापैकी ४० टक्के जखमी झालेल्या व्यक्तीवर वांद्रे येथील भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत़
पवईच्या आगीत ७ जणांचा मृत्यू
By admin | Updated: June 7, 2015 04:03 IST