शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन घोटाळा प्रकरणांमध्ये ७ जणांवर गुन्हे, १० निलंबित

By admin | Updated: September 4, 2016 03:38 IST

राज्याच्या विविध भागांतील सिंचन प्रकल्पांच्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचार व गैरव्यवहारांच्या संदर्भात शनिवारी तीन ठिकाणी कारवाया झाल्या. पुणे जिल्ह्यातील टेमघर धरणाच्या गळतीप्रकरणी

मुंबई : राज्याच्या विविध भागांतील सिंचन प्रकल्पांच्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचार व गैरव्यवहारांच्या संदर्भात शनिवारी तीन ठिकाणी कारवाया झाल्या. पुणे जिल्ह्यातील टेमघर धरणाच्या गळतीप्रकरणी जलसंपदा विभागाच्या १० अभियंत्यांना निलंबित करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील कोंढाणे प्रकल्पातील गैरव्यवहारांसंदर्भात शासकीय अधिकारी व कंत्राटदार असे मिळून सात जणांविरुद्ध गुन्हे नोंदविले गेले, तर गोसीखुर्द प्रकल्पातील घोडाझरी कालव्याच्या कामातील घोटाळ्यात नागपूरच्या विशेष न्यायालयात पाच सरकारी अधिकारी व एक कंत्राटदार यांच्यासह सहा जणांवर पहिले आरोपपत्र दाखल केले गेले.विशेष म्हणजे मुंबईचे निस्सार फतेह मोहम्मद अब्दुल्ला खत्री हे ठाण्यात नोंदविलेला गुन्हा व नागपूर येथे दाखल झालेले आरोपपत्र या दोन्हींमध्ये आरोपी आहेत. ते एफ. ए. कन्स्ट्रक्शन या कंत्राटदार कंपनीचे भागीदार आहेत. घोडाझरीच्या कामात निविदेचे नियमबाह्य अद्ययावतीकरण करून खत्री यांच्या फर्मला ७.३८ कोटी रुपयांचा बेकायदा लाभ मिळवून दिल्याचा आरोप आहे. तर कोंढाणे प्रकल्पाच्या कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता न घेता व नव्याने निविदा न काढता खत्री यांना २७१ कोटी रुपयांचा वाढीव ठेका दिल्याचा गुन्हा ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.टेमघर धरणाच्या गळतीप्रकरणी नऊ ठेकेदारांसह १५ निवृत्त व १० विद्यमान अधिकाऱ्यांविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून सर्व नऊ कंत्राटदारांना याआधीच काळया यादीत टाकण्यात आले होते. सेवेत असलेल्या जलसंपदा विभागाच्या १० अभियंत्यांना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशानुसार शनिवारी निलंबित करण्यात आले. त्यांत तत्कालीन कार्यकारी अभियंता ए. एस. मोरे, तत्कालीन उपविभागीय अभियंता आर. बी. गलियाल व व्ही. के. लोमटे, एस. एस. टिळेकर, बी. बी. ढेरे, टी. ए. देशपांडे, एस. डी. कोकाटे, जे. वाय.सूर्यवंशी, एच. के. धामणकर आणि आर. डी. पाटील या आठ तत्कालीन शाखा अभियंत्यांचा समावेश आहे.ठाण्यात गुन्हे नोंदविलेल्यांमध्ये तत्कालीन कार्यकारी अभियंता डी. पी. शिर्के, तत्कालीन मुख्य अभियंता बा. भा. पाटील, तत्कालीन अधीक्षक अभियंता आर. डी. शिंदे, तत्कालीन मुख्य अभियंता प्र.भा. सोनावणे, तत्कालीन कार्यकारी अभियंता ए.पा. काळुखे (सर्व सेवानिवृत्त), तत्कालीन कार्यकारी अभियंता रा. चं. रिठे (निलंबित) आणि निस्सार फतेह मोहम्मद खत्री या कंत्राटदाराचा समावेश आहे.(प्रतिनिधी)तटकरेंंच्या मागेही शुक्लकाष्ठ?कोंढाणे धरणाच्या कामाचे कंत्राट मंजूर झाले, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आताचे प्रदेशाध्यक्ष राज्याचे जलसंपदामंत्री होते. त्यामुळे नोंदविलेल्या गुन्ह्यात त्यांचे नाव नसले तरी त्यांचीही चौकशी होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.आरोपपत्रात यांचा समावेशनागपूरमध्ये ज्यांच्याविरुद्ध ६,४३४ पानांचे आरोपपत्र दाखल झाले त्यांत तत्कालीन मुख्य अभियंता सोपान सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता रमेश वर्धन, तत्कालीन वरिष्ठ विभागीय लेखाधिकारी गुरुदास मांडवकर, तत्कालीन अधीक्षक अभियंता संजय खोलापूरकर, तत्कालीन कार्यकारी संचालक रोहिदास लांडगे व कंत्राटदार खत्री यांचा समावेश आहे.