शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

६८ वर्षांची झाली एस.टी.! :

By admin | Updated: June 1, 2016 08:31 IST

महाराष्ट्र राज्य सर्वव्यापी प्रगतीच्या वळणावर प्रवास करत असताना आज १ जून रोजी एस.टी.ला ६८ वर्ष पूर्ण होत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या या प्रवासात जी काही सामाजिक,

महाराष्ट्र राज्य सर्वव्यापी प्रगतीच्या वळणावर प्रवास करत असताना आज १ जून रोजी एस.टी.ला ६८ वर्ष पूर्ण होत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या या प्रवासात जी काही सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जडण-घडण झाली, त्यामध्ये एस. टी. बसचा वाटा आहेच. एस.टी.ने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कच्च्या रस्त्यावरील धुराळा उडवत, ऊन-पावसाची तमा न बाळगता, प्रसंगी वादळाचे तडाखे सहन करत राज्याची ध्येय-धोरणे ग्रामीण जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम अविरतपणे केलेले आहे. या ६८ वर्षांच्या कालखंडात अनेक चढ-उतार एस.टी.च्या बसने ओलांडले आहेत.

केवळ ३५ बेडफोर्ड वाहनांवर १ जून १९४८ला एस.टी.ची सुरु वात झाली. एस.टी. ऐवजी सरकारी बस अशीच ओळख होती. प्रवासासाठी रस्ते अतिशय खराब असल्याने गाड्या बंद पडण्याचे प्रमाण फार. त्यामुळे साधारण १५० कि.मी.च्या पुढे प्रवास होत नव्हता. गाड्या बंद पडण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे ड्रायव्हरला अवजारांची पेटी बरोबर घ्यावी लागायची.एस.टी.ची पहिली बस धावली ती पुणे-नगर या शहरांदरम्यान. नगर शहरात साखर कारखान्याची निर्मिती होऊ लागली होती, त्यामुळे दळण-वळणाचा प्रश्न होताच. पुणे ते नगरचे त्याकाळी तिकीट होते ९ पैसे!ट्रक किंवा जीपच्या पुढील आकार कसा असतो, तसाच पुढील आकार या सरकारी वाहनाचा होता. संपूर्ण बॉडीची बांधणी व आसन-व्यवस्था लाकडाची होती. खिडक्या म्हणून खाकी ताडपत्रीची तावदान. हॉर्न वाजवत पम पम करत एस.टी गावात आली की तिचे फार जल्लोषात स्वागत होत असे. रात्रीच्या वस्तीला गावात असलेल्या गाडीला सकाळी जेव्हा स्टार्ट करायचे असे तेव्हा गाडीच्या पुढील भागात एक पुली असायची. त्या पुलीला कंडक्टर हँडल मारून गाडीचे इंजिन स्टार्ट करायचा. थंडीच्या दिवसात हे काम फार जिकरीचे असायचे. थंड झालेले इंजिन गरम व्हायला वेळ लागायचा. मग गावातील थोडेसे दणकट ग्रामस्थ हँडल मारायच्या कामात कंडक्टरची मदत करायचे.खाकी गणवेश व डोक्यावर पिक-कॅप हा कंडक्टर्स-ड्रायव्हर्सचा पेहराव. गावात या सरकारी गाडीचा व कंडक्टर्स-ड्रायव्हर्सचा फारच सन्मान. गावाचे सरपंच व कोतवाल अगदी त्यांची जेवणापासून ते राहण्यापर्यंत व्यवस्थित काळजी घेत असत. या प्रवासी वाहनाची गरज वाढू लागली तस-तसा विस्तारही सुरू झाला.मोठमोठ्या कंपन्यांची बांधणी असलेली एस.टी. बस तयार होऊ लागली. ती धावू लागली. आपल्या गावात एस.टी. यावी म्हणून सर्व गावाच्या गाव अंगमेहनतीने रस्ता तयार करायचा व ज्या दिवशी एस.टी. बस गावात येणार असायची त्यावेळी संपूर्ण गाव पताकांनी सजायचा. बॅण्ड पथकाच्या सहाय्याने वाजत-गाजत एस.टी.बसचे स्वागत व्हायचे. टप्याटप्प्याने ‘जिथे गाव तिथे रस्ता’ या शासनाच्या धोरणानुसार एस.टी.ची बस धावू लागली. एस.टी.ने केवळ गावच नव्हे माणसातील नातीही जोडली.एस.टी.चा सुरु वातीचा काळ फार खडतर होता. बसगाड्यांची अवस्था फारशी बरी नव्हती. आगार-व्यवस्थापकांची कार्यालये पत्र्यांच्या शेडमध्ये असत. कार्यशाळेतील कर्मचारी पावसात व चिखलात भिजून प्रवाशांसाठी बसेस तयार करीत असत. म्हणून आज जो एस.टी.चा विस्तार झाला आहे, तो याच कर्मचाऱ्यांच्या जीवावर.महाराष्ट्राच्या शैक्षणिक विकासात एस.टी.चा वाटा हा सिहांचा आहे. एस.टी.बसमुळेच विद्यार्थ्यांचे शहरात येऊन पुढील शिक्षण घेणे शक्य झाले. शहरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे जेवणाचे डबे एस.टी. बसनेच विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत. त्यात खुशालीचे पत्रे व निरोपही असत. संपूर्ण ग्रामीण यंत्रणाच एस.टी.बसवर अवलंबून होती. एखादी बाळंतपणासाठी अडलेली भगिनी असो वा सर्पदंश झालेला रु ग्ण, अशा आपत्कालीन स्थितीत एस.टी.चे वाहन गावकऱ्यांच्या उपयोगी पडते. पोस्ट खात्याची टपाल सेवा, औषधांचे वितरण, वृत्तपत्रे, होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका, सण-उत्सव व लग्न सराईमध्ये प्रवाशांची सुखरूप ने-आण हे सर्व एस.टीवरच अवलंबून असायची.१९५० साली प्रवाशी वाहतुकीचे राष्ट्रीयकरण झाले व अधिकृत एस.टी महामंडळाची निर्मिती झाली. दिवसेंदिवस महामंडळ प्रगतीच्या व बदलाच्या दिशेने प्रवास करू लागले. १९५० साली २ लक्झरी बसेस नीलकमल व ग्लोरीया, रोहिणी पुणे ते महाबळेश्वर या पर्यटन मार्गावर धावू लागल्या.