खडसंगी (चंद्रपूर) : चिमूर तालुक्यातील डोंगरगाव तलावाजवळील एका नाल्यात विविध प्रजातीचे ६५ पक्षी मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शंकरपूर येथील वन्यप्रेमी युवराज मरस्कर, सर्पमित्र जगदीश पेंदाम, अमित शिवरकर जंगलात फिरत होते. त्यावेळी त्यांना एका शेताजवळ वाघाच्या पायाचे ठसे आढळले. त्या ठश्यांचा मागोवा घेत जात असताना डोंगरगाव तलावाजवळील छोट्या नाल्याजवळ एका पोत्यात अनेक प्रजातीचे ६५ पक्षी मृतावस्थेत आढळून आले. त्यामध्ये ५६ मैना, ३ बुलबुल, २ रानकबुत्तर, २ तितर आणि १ दयाल पक्षांचा समावेश आहे. यावरुन या परिसरात पक्षांची शिकार होत असल्याला बळकटी मिळाली असून वनविभागाने चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी वन्यप्रेमींनी केली आहे. परीसरात खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)
गोणीत ६५ पक्षी मृतावस्थेत आढळले
By admin | Updated: May 24, 2016 03:26 IST