शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेसाठी ६० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2017 21:51 IST

पारी मतदार मोठ्या संख्येने शहरासह उपनगरांमध्ये बाहेर पडल्यामुळे मतदानाचा टक्का ४३.३३वर पोहचला आणि संध्याकाळपर्यंत सर्व केंद्रांवर मिळून एकूण ६० टक्के मतदान

नाशिक : शहरात महापालिका निवडणूकीचे सकाळी साडेसात ते साडेबारा वाजेपर्यंत १९ टक्के मतदान झाले होते; मात्र दुपारी मतदार मोठ्या संख्येने शहरासह उपनगरांमध्ये बाहेर पडल्यामुळे मतदानाचा टक्का ४३.३३वर पोहचला आणि संध्याकाळपर्यंत सर्व केंद्रांवर मिळून एकूण ६० टक्के मतदान झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली आहे.सकाळपासून शहरातील गावठाण भागासह उपनगरांमध्येही मतदानाचा ओघ कमीच राहिला; मात्र दुपारी दीड ते साडे तीन च्या कालावधीत सरासरी १३ टक्क्यांनी वाढ होऊन मतदानाचा टक्का ४३.३३वर पोहचला. दरम्यान, सोशल मिडियावरुन भावनिक लघुसंदेशाची ‘पोस्ट’ व्हायरल झाली. या पोस्टमधून नाशिककरांना मोठ्या संख्येने बाहेर पडून नाशिकच्या प्रगतीसाठी मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. सदर पोस्ट चांगलीच प्रभावी ठरली. दुपारी चारनंतर उन्हाची तीव्रता कमी झाली आणि नागरिकांवर सोशल पोस्टचा सकारात्मक प्रभाव पडल्याने लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी मतदार मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. संध्याकाळी साडेपाच वाजेनंतर सर्वच केंद्रांचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते; मात्र जुने नाशिकसह उपनगरीय भागांमध्ये देखील बहुसंख्य केंद्रांच्या आतमध्ये लांबलचक रांगा लागलेल्या होत्या. यामुळे केंद्रामधील सर्व नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता आला आणि संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत काही केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. एकूण सुमारे ६० टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली आहे.