शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

म्यानमारमधून ६० भारतीय ‘सायबर गुलाम’ बनवलेल्या तरुणांची सुटका, महाराष्ट्र सायबरची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 10:47 IST

Cyber Crime News: विदेशात नोकरीचे प्रलोभन दाखवत सायबर गुलाम बनविलेल्या ६० भारतीयांची म्यानमारमधून सुटका करण्यास महाराष्ट्र सायबरला यश आले आहे.

मुंबई - विदेशात नोकरीचे प्रलोभन दाखवत सायबर गुलाम बनविलेल्या ६० भारतीयांची म्यानमारमधून सुटका करण्यास महाराष्ट्र सायबरला यश आले आहे. याप्रकरणी राज्य सायबरने तीन गुन्हे नोंदवत मनीष ग्रे उर्फ मॅडी, तैसन उर्फ आदित्य रवी चंद्रन, रूपनारायण रामधर गुप्ता, आणि जेन्सी रानी डी या चार भारतीयांसह तलानीती नुलाक्सी चीन/कझाकस्तानी नागरिक अशा पाच आरोपींना अटक केली आहे. 

म्यानमारमध्ये नेलेल्या काही तरुणांनी कुटुंबीयांशी संपर्क साधत येथून सुटका करण्याची विनंती केली. त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे मदतीची मागणी केली. या प्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी केंद्र सरकारच्या मदतीने ऑपरेशन राबवत एकूण ६० जणांची सुखरूप सुटका केली आहे. मुख्य आरोपींपैकी एक असलेला मनीष ग्रे/मॅडी हा अभिनेता असून त्याने वेब मालिका आणि दूरदर्शन कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. थायलंडमध्ये रोजगाराच्या संधी मिळवून देण्याच्या नावाखाली व्यक्तींची भरती करणे, त्यांची म्यानमारमध्ये तस्करी करणे यात त्याची मुख्य भूमिका होती. तो म्यानमार, थायलंड, मलेशिया आणि भारतासह अनेक ठिकाणांहून सक्रियपणे कार्यरत असल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. 

सुरू होता गुलामगिरीचा जाच...सशस्त्र बंडखोरांच्या ताब्यात दिल्यानंतर पीडितांना एका कंपाउंडमध्ये कोंडले जाते. त्यानंतर सायबर फसवणूक, शेअर्स ट्रेडिंग, गुंतवणूक, टास्क, डिजिटल अटक अशी कामे करण्यासाठी त्यांचा छळ होत असे. त्यास विरोध करताच त्यांच्या शरीराचे भाग काढून त्यांची विक्री करण्याची धमकी दिली जात होती. सर्वत्र सशस्त्र बंडखोर तैनात असल्याने येथे तरुणांना जीवाच्या भीतीने काम करावे लागत असल्याचे तरुणांच्या चौकशीत समोर आले. 

सोशल मीडियाचा वापर फेसबूक, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडिया ॲपवर विदेशातील नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना एजंट आपल्या जाळ्यात ओढायचे. पुढे, चांगले संभाषण करणाऱ्या तरुणांची निवड करुन त्यांचा पासपोर्ट तयार करत व्हिसा, विमान तिकिटांची व्यवस्था करुन तरुणांना टुरिस्ट व्हिसावर थायलंडला पाठवले जात होते. 

नदीवाटे थेट जंगलातथायलंडला उतरल्यानंतर टोळीतील एक एजंट सोबत जातो किंवा त्या तरुणांचे फोटो तेथील एजंटला पाठविले जातात. थायलंड विमानतळावरुन पुढे नोकरीच्या ठिकाणी पाठवले जाईल असा आभास तयार करून तेथील एजंट तरुणांना थायलंड-म्यानमार सीमेच्या दिशेने सात ते आठ तास प्रवास करून नेतात. आधीच पासपोर्ट काढून स्वतःकडे घेतात. पुढे, थायलंडमधून म्यानमारमध्ये प्रवेश करण्यासाठी लहान बोटीतून नदी ओलांडून या तरुणांना येथील सशस्त्र पहाऱ्यात असलेल्या म्यावाड्डी परिसरात नेले जाते. यात भारतीय एजंट आपल्याला सुमारे पाच हजार डाॅलर्सला विकत असल्याचे सुटका झालेल्या एकाने सांगितले. या भरतीची सुविधा करणाऱ्या एजंटना प्रति व्यक्ती एक हजार यूएस डॉलर्सपर्यंत रक्कम मिळत असल्याचे समोर आले. 

पाच हजार डॉलरमध्ये माझाच सौदा हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून नोकरी करत होतो. चांगला पगार होता. सगळे सुरळीत सुरू होते. एका टोळीच्या जाळ्यात अडकून विदेशात चांगल्या पगाराच्या नोकरीच्या मोहात थायलंड गाठले. मात्र, तेथून आलिशान कार्यालयात न पोहोचता म्यानमारच्या निर्जन कंपाउंडमध्ये पोहोचलो. तेथे माझा पाच हजार डॉलरमध्ये सौदा झाला. एका जंगलाच्या कोपऱ्यात जिथे आजूबाजूला फक्त शस्त्र घेऊन असलेली पहारेकरी. मारून झोडून सगळी कामे करून घेत होते, असे म्यानमारमधून सुटका झालेला सतीश सांगतो. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमMumbaiमुंबईMyanmarम्यानमार