शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात एसटी चालक - वाहकांचा संप सुरूच ५८७ बसफेऱ्या रद्द; ६० लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 20:12 IST

जिल्ह्याभरातील आठ बस आगारातील एक हजार १४४ बस फेऱ्यापैकी सायंकाळी चार वाजेपर्यंत ५८७ फेऱ्या  रद्द कराव्या लागल्या. तर केवळ ५५७ बसफेऱ्या  ठिकठिकाणी पूर्ण झाल्या आहेत. ऐनवेळी या बसेस रद्द केल्यामुळे सुमारे ४० टक्के किलो मीटर कमी झाले आहेत. यामुळे दोन दिवसांच्या कालावधीत एसटी महामंडळाच्या ठाणे विभागाचे ६० लाखांचे नुकसान

ठळक मुद्देआठ बस आगारातील एक हजार १४४ बस फेऱ्याकेवळ ५५७ बसफेऱ्या  ठिकठिकाणी पूर्ण एसटी महामंडळाच्या ठाणे विभागाचे ६० लाखांचे नुकसान

ठाणे : एसटी कर्मचाऱ्यानी अचानक पुकारलेला संप शनिवारच्या दुसऱ्या  दिवशी सुरूच आहे.जिल्ह्याभरातील आठ बस आगारातील एक हजार १४४ बस फेऱ्यापैकी सायंकाळी चार वाजेपर्यंत ५८७ फेऱ्या  रद्द कराव्या लागल्या. तर केवळ ५५७ बसफेऱ्या  ठिकठिकाणी पूर्ण झाल्या आहेत. ऐनवेळी या बसेस रद्द केल्यामुळे सुमारे ४० टक्के किलो मीटर कमी झाले आहेत. यामुळे दोन दिवसांच्या कालावधीत एसटी महामंडळाच्या ठाणे विभागाचे ६० लाखांचे नुकसान झाल्याचा आंदाज विभाग ठाणे नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी व्यक्त केला.       ठाणे जिल्ह्यातील सामान्य जनतेसह विद्यार्थी, वयोवृध्दांसह रूग्णांचे प्रचंड हाल झाले. या संपाची मोठी झळ जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी, दुर्गमभागाला बसली आहे. जिल्ह्यातील आठ बस आगारातील ५० टक्के बसेस आजच्या दुसऱ्या  दिवशी देखील बंद होत्या. पहिल्या दिवशी सुमारे ४८ टक्के वाहक व चालकांनी सक्रीय सहभाग घेतल्याने संध्याकाळपर्यंत ५५० फेऱ्या  रद्द केल्या होत्या. या दरम्यान आठ वाहक, चालक व अन्यकर्मचाऱ्याना निलंबित केले मात्र आज तशी कोठेही कारवाई झाली नाही. याशिवाय दरम्यान कोठेही खाजगी बसेस, कंपन्या व शाळांच्या बसेसव्दारे प्रवाशी वाहतूक सुरू नसल्याचा दावा चव्हाण यांनी केला. सकाळी ७० टक्के व सायंकाळी ६० टक्के बसेस सुरू असल्याचा दावाही त्यांनी लोकमतकडे केला.      जिल्ह्याभरातील आठ बस आगारांपैकी ठाणे १ व ठाणे २ या आगारातील प्रत्येकी ११८ बसफेऱ्या  रद्द केल्या आहेत. याशिवाय भिवंडी आगारात सर्वाधिक १६४ बस फेऱ्या  रद्द केल्यामुळे केवळ ५२ फेऱ्या  दुपारनंतर पूर्ण झाल्या. या खालोखाल शहापूरला ६३ फेऱ्या , कल्याणला केवळ २२ फेरी, विठ्ठलवाडीला ८०, मुरबाडला ११ फेऱ्या  आणि वाडा येथे देखील आज ११ बसफेऱ्या  रद्द कराव्या लागल्या आहेत. कालच्या तुलनेत कल्याण मुरबाड व वाडा येथे आज बसफेऱ्या  रद्द करव्या लागल्याचे निदर्शनात आले.

टॅग्स :thaneठाणे